रत्नागिरीत एसटी वर्कशॉपच्या भंगार गोडाऊनला आग

राजेश कळंबटे, अमोल कलये
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018

रत्नागिरी - येथील एसटी वर्कशॉपच्या भंगार गोडाऊनला आज दुपारी एकच्या सुमारास आग लागली. या आगीत लाखोे रूपयांचे भंगार जळून खाक झाले आहे.

रत्नागिरी - येथील एसटी वर्कशॉपच्या भंगार गोडाऊनला आज दुपारी एकच्या सुमारास आग लागली. या आगीत लाखोे रूपयांचे भंगार जळून खाक झाले आहे.

रत्नागिरीतल्या टीआरपी परिसरातमध्ये एसटीचे मोठे  वर्कशाॅप आहे. याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात भंगार आहे. या भंगाराचा आज लिलाव होणार होता. हा लिलाव ऑनलाईन सुरु होता. मात्र ऑनलाईन लिलाव प्रक्रिया सुरु असतानाच दुपारी एक ते दीडच्या सुमारास इथल्या भंगाराला आग लागली. बघता बघता आगीने रौद्र रुप धारण केले. याच वर्कशॉपध्ये लाखो रुपयांचे भंगार साठवून ठेवण्यात आले होते. भंगाराच्या लिलाव प्रक्रियेदिवशी अचानकपणे आग लागतेच कशी असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. याठिकाणी एसटीच्या सीट्स, पत्रा तसेच प्लास्टिकचे बॅरेल, अॅल्युमिनिअम आणि एसटीच्या कुशन सीटस असल्यामुळे ही आग मोठ्या प्रमाणात भडकली. अग्निशमन दलाचे चार बंब आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम करत आहेत. मात्र या आगीत लाखो रुपयांचे भंगार जळून खाक झाले आहे. मात्र लिलावाच्याच दिवशी भंगाराला लागलेल्या आगीमुळे संशयाचा धूर पसरू लागला आहे.

Web Title: Ratnagiri News fire to ST Workshop storage