'तेजस'मधील 23 प्रवाशांना अन्नातून विषबाधा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 ऑक्टोबर 2017

रत्नागिरी - कोकण रेल्वेच्या सुपरफास्ट तेजस एक्‍स्प्रेसमधील 23 प्रवाशांना खाण्यातून विषबाधा झाल्याने एक्‍स्प्रेस चिपळून स्थानकात थांबवण्यात आली. बाधितांना तातडीने चिपळूणमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यानंतर ही एक्‍स्प्रेस मडगावहून मुंबईक़डे रवाना करण्यात आली.

तेजस एक्‍स्प्रेस ही देशातील सर्वात वेगवान एक्‍स्प्रेस आहे. तेजस एक्‍स्प्रेस दर रविवारी करमळीहून सीएसएमटीकडे रवाना होते. आजही तेजस आपल्या नियोजित वेळेप्रमाणे मुंबईच्या दिशेने निघाली. मात्र चिपळूणच्या जवळपास पोहोचताच अनेक प्रवाशांना त्रास जाणवू लागला. अन्नातून विषबाधा झाल्याचे लक्षात येताच तेजस चिपळून स्टेशनवर थांबवण्यात आली. त्यानंतर प्रवाशांना चिपळुणातील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ही विषबाधा नेमक्‍या कोणत्या अन्नातून झाली याचा तपास सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. हे अन्न आयआरसीटीकडून पुरविले जाते. रत्नागिरीत नाष्ट्याची पॅकेटस्‌ पुरविण्यात आल्याचे रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी एल. के. वर्मा यांनी सांगितले. या प्रकरणाची कसून चौकशी केली जाईल, अशी प्रतिक्रिया खासदार विनायक राऊत यांनी व्यक्‍त केली. तसेच विषबाधा झालेल्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांची व्यवस्था कोकण रेल्वेमार्फत करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
Web Title: ratnagiri news food poising in Tejas Express