मुंबई - गोवा मार्ग चौपदरीकरणाचे काम पावसाळ्यात ठरणार डोकेदुखी

राजेश कळंबटे
शुक्रवार, 18 मे 2018

रत्नागिरी - मुंबई-गोवा महामार्गावरील चौपदरीकरणाच्या कामाचा फटका पावसाळ्यात वाहतूकीला बसणार आहे. डोंगरच्या डोंगर कापले जात आहेत. मुसळधार पावसामुळे चिखल मिश्रीत पाणी रस्त्यावर येऊन अपघात किंवा वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागणार आहे. गेल्यावर्षी खंबाटकी घाटात घडलेल्या चिखल मिश्रीत पाण्याच्या लोंढ्यासारखा प्रकार महामार्गावर घडण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे.

डोंगर दर्‍यातून जाणारा मुंबई-गोवा महामार्गावर अनेक घाट आहेत. ते कापून चौपदरीकरणाचे काम हाती घेतले आहे. 2019 पर्यंत 70 टक्के काम करण्याचे आदेश असल्यामुळे कंत्राटदारही कामाला लागले. पोकलेनच्या मदतीने रस्त्याच्या शेजारील डोंगरातील माती काढली जात आहे. डोंगर उभे कापण्यात आले आहेत. काही ठिकाणी मार्गाच्या शेजारील भाग खोदून ठेवले आहेत. हे करताना पाणी जाण्यासाठी आवश्यक मार्ग ठेवण्यात आलेले नाहीत. रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी पाऊस तीन हजार मिलिमीटर पडतो. मुसळधार पावसात डोंगरातील पाणी वाहून रस्त्यावर येते. सध्या काम सुरु असल्याने चिखलाचे पाणी थेट रस्त्यावर येणार आहे. तो चिखल साचून राहण्याची भिती आहे. यासाठी पुढील पंधरा दिवसात पाणी वाहून जाण्यासाठीचे चर तयार करावे लागणार आहेत.

गतवर्षी पुण्यात खंबाटकी घाटामध्ये डोंगरातील चिखल मिश्रित पाण्याचे लोंढे रस्त्यावर आले. त्या दुर्घटनेत जिवितहानीही झाली होती. सर्वाधिक धोकादायक पॅच संगमेश्‍वर ते लांजा, राजापूर या टप्प्यात आहेत. चिखल वाहून छोट्या वहाळात गेले तर ते बूजतील. या गोष्टींसाठी प्रशासनाला सज्ज राहावे लागणार आहे.

डोंगर कापल्यानंतर पावसाचे पाणी व्यवस्थित वाहून जाईल यादृष्टीने उताराचे भाग तयार केले पाहीजेत. ओढ्याची पात्रे बुजणार नाहीत ना याची काळजी घेतली पाहीजे.

- सुरेंद्र ठाकूरदेसाई, भूगर्भ तज्ज्ञ

Web Title: Ratnagiri News Four Track Road work issue