पाच लाख निधी मंजूर, पण झडपे केव्हा बसणार?

सुधीर विश्‍वासराव
रविवार, 15 एप्रिल 2018

पावस - रत्नागिरी तालुक्यातील गावडेआंबेरे खारभूमी बंधार्‍याच्या तुटलेल्या झडपांकरिता पाच लाख दहा हजार मंजूर झाले आहेत. शेतकर्‍यांच्या मागणीला यश आले आहे. पण झडपे केव्हा बसणार हा प्रश्‍न आता शेतकऱ्यांना पडला आहे.

पावस - रत्नागिरी तालुक्यातील गावडेआंबेरे खारभूमी बंधार्‍याच्या तुटलेल्या झडपांकरिता पाच लाख दहा हजार मंजूर झाले आहेत. शेतकर्‍यांच्या मागणीला यश आले आहे. पण झडपे केव्हा बसणार हा प्रश्‍न आता शेतकऱ्यांना पडला आहे.

रत्नागिरी तालुक्यातील गावडेआंबेरे येथील खारभूमी बंधार्‍यामुळे गावडेआंबेरे, मावळंगे, नातूंडे परिसरातील शेकडो एकर जमीन लागवडीखाली आली होती. 1998 पूर्वी बंधारा नसताना शेती संरक्षक बंधारे असूनही खारेपाणी शेतीत पसरत होते. पण बंधाऱ्यावरील स्वयंचलित झडपांमुळे शेकडो एकर जमीनी लागवडीखाली आल्या. विहिरीत गोड्या पाण्याचा साठा वाढला. शेतकर्‍यांना याचा फायदा होत होता पण मच्छीमारांचे नुकसान होत असल्यामुळे झडपे तोडण्यात आली. यावर कारवाईनंतर आता काही प्रमाणात प्रतिबंध झाला. परंतु सततचा पाण्याचा दाब व दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे झडपे तुटल्याने मोठ्या प्रमाणात खारेपाणी घुसू लागल्याने पुन्हा शेती नापिक झाली  आहे. विहिरींचे पाणीही खारे झाले आहे. शेतकर्‍यांच्या सततच्या मागणीचा विचार करून भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने, तालुकाध्यक्ष सतीश शेवडे, सरचिटणीस नाना शिंदे, पंचायत समिती सदस्य सुशांत पाटकर यांनी सातत्याने याचा पाठपुरावा केला. याबाबत लेखी निवेदन बंदर विकासमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे दिले. त्यानंतर खारभूमी योजनेंतर्गत 26 झडपांकरिता पाच लाख दहा हजार रुपये मंजूर केले, परंतु पावसाळ्यापूर्वी झडपे बसवण्याची मागणी होत आहे. नाहीतर खार्‍या पाण्याचा सामना शेतकर्‍यांना करावा लागणार आहे.

Web Title: Ratnagiri News fund sanctioned for work