शासकीय तंत्रनिकेतनकडे पाठ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

रत्नागिरी - शासकीय तंत्रनिकेतनच्या पदविका अभ्यासक्रमाला नव्या शैक्षणिक वर्षात अल्प प्रतिसाद मिळाला आहे. उपलब्ध जागेच्या पन्नास टक्‍केच अर्ज आले आहेत. त्यामुळे २०१८-१९ या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, असे आवाहन शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य गणेश खुरसाडे यांनी केले आहे. 

रत्नागिरी - शासकीय तंत्रनिकेतनच्या पदविका अभ्यासक्रमाला नव्या शैक्षणिक वर्षात अल्प प्रतिसाद मिळाला आहे. उपलब्ध जागेच्या पन्नास टक्‍केच अर्ज आले आहेत. त्यामुळे २०१८-१९ या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, असे आवाहन शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य गणेश खुरसाडे यांनी केले आहे. 

पदविका अभ्यासक्रम बंद करण्याच्या शासनाच्या निर्णयामुळे ही परिस्थिती ओढवली. प्रवेश घ्या, असे आवाहन विद्यार्थ्यांना प्राचार्य करत आहेत. राज्य शासनाने रत्नागिरीसह यवतमाळ, धुळे, जालना, सोलापूर व लातूर येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील पदविका अभ्यासक्रमाचे पदवी अभ्यासक्रमात श्रेणीवर्धन करून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या विरोधात आजी-माजी विद्यार्थी, पालकांनी रत्नागिरीत नाक्‍यानाक्‍यावर निषेध मोर्चे काढले. प्रत्येक आमदारांमार्फत हा प्रश्‍न विधानसभेत मांडला. ३० जानेवारी २०१८ ला २०१८-१९ या शैक्षणिक वर्षासाठी तंत्र शिक्षण संचालनालयाने हिरवा कंदील दाखविला. त्यामुळे यावर्षी रत्नागिरी तंत्रनिकेतनमधील अभ्यासक्रम सुरू आहेत.

शासनाकडून परवानगी आली तरीही विद्यार्थी आणि पालकांमध्ये महाविद्यालयाबाबत संभ्रमच आहे. त्यामुळे यावर्षीच्या नव्या शैक्षणिक वर्षातील प्रवेशाला अल्प प्रतिसाद मिळाला. इंजिनिअरिंग पदवीकेसाठी ४९७ जागांसाठी २३५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. डी. फार्मच्या ३० जागांसाठी १२० जणांचे अर्ज आहेत. अतिथी व्याख्यातांमार्फत अभ्यासक्रम पूर्ण केला जातो. एकूण ९ अभ्यासक्रम शिकवले जातात.

प्रक्रियेचे वेळापत्रक
तंत्रनिकेतनमधील प्रवेशाबाबत सुरू केलेला मार्गदर्शन कक्ष सुटीच्या दिवशीही सुरू आहे. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबईमार्फत ३ जुलैला सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत प्रवेशासाठी समुपदेशन झाले. त्याला अल्प प्रतिसाद मिळाला. संस्थेत प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविकेसाठी १६ जुलैपर्यंत, औषधनिर्माणशास्त्र पदविकेसाठी १७ जुलै, द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविकेसाठी १२ जुलैपर्यंत ऑनलाईन प्रवेशाची मुदत आहे.

Web Title: Ratnagiri News Government Polytechnic admission issue