दापोलीत ग्रामपंचायत निवडणूकीत ११३ सदस्य बिनविरोध

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017

दाभोळ - दापोली तालुक्‍यातील ३० ग्रामपंचायतींच्या निवडणुकांपैकी १६ ग्रामपंचायतींमधील ११३ सदस्य बिनविरोध निवडून आले असून १२ ग्रामपंचायतींमधील सरपंच बिनविरोध निवडून आले असल्याची माहिती तहसील कार्यालयातून देण्यात आली.

दाभोळ - दापोली तालुक्‍यातील ३० ग्रामपंचायतींच्या निवडणुकांपैकी १६ ग्रामपंचायतींमधील ११३ सदस्य बिनविरोध निवडून आले असून १२ ग्रामपंचायतींमधील सरपंच बिनविरोध निवडून आले असल्याची माहिती तहसील कार्यालयातून देण्यात आली.

तालुक्‍यातील कोळबांद्रे, आगरवायंगणी, शिरसाडी, भडवळे, सडवे, पाचवली, उंबर्ले, देगाव, दमामे, वेळवी, विरसई, करंजाणी या ग्रामपंचायतींमधील सर्व सदस्यांसह सरपंच बिनविरोध निवडून आले असून मुर्डी, सारंग, कदिवली व कळंबट या चार ग्रामपंचायतींमधील सर्व सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. बिनविरोध झालेल्या वेळवी, शिरसाडी व पाचवली या ग्रामपंचायतींमधील प्रत्येकी १ जागा तांत्रिक कारणामुळे रिक्‍त राहिली आहे. 

तालुक्‍यातील १४ ग्रामपंचायतींमधील ११७ सदस्यांसाठी १८१ उमेदवार रिंगणात असून १८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी ४३ उमेदवार रिंगणात आहेत. वांझळोली ग्रामपंचायतीच्या ७ सदस्यांपैकी प्रभाग क्रमांक १ व २ मधील चार जागांसाठी ८ उमेदवार रिंगणात असून प्रभाग क्र. ३ मधील ३ जागांची निवडणूक बिनविरोध निवड झाली आहे. कुडावळे ग्रामपंचायतीच्या ९ जागांपैकी प्रभाग क्र. १ मधील ३ सदस्य बिनविरोध निवडून आले असून प्रभाग क्र. २ मधील ३ जागांसाठी ४ तर प्रभाग क्र. ४ मधील ३ जागांसाठी ६ उमेदवार रिंगणात आहेत.

सातेरे ग्रामपंचायतीच्या ७ जागांपैकी प्रभाग क्र. १ मधील ३ जागांसाठी ६, तर प्रभाग क्र. २ मधील २ जागांसाठी ३ उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग क्र. ३ मधील २ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. सोवेली ग्रामपंचायतीच्या ७ जागांपैकी प्रभाग १ व २ मधील ४ सदस्य बिनविरोध निवडून आले. प्रभाग ३ मधील ३ जागांसाठी ५ उमेदवार रिंगणात आहेत.

शिर्दे ग्रामपंचायतीच्या ७ जागांपैकी प्रभाग क्र. १ व ३ मधील ४ सदस्य बिनविरोध निवडून आले असून प्रभाग २ मधील ३ जागांसाठी ४ उमेदवार रिंगणात आहेत. बोंडिवली ग्रामपंचायतीच्या ७ जागांपैकी प्रभाग २ व ३ मधील ५ सदस्य बिनविरोध निवडून आले. प्रभाग १ मधील  २ जागांसाठी ४ उमेदवार रिंगणात आहेत. आपटी येथे ७ जागांसाठी १४ उमेदवार रिंगणात आहेत. देहेण येथे ७ जागांसाठी १४ उमेदवार रिंगणात आहेत.

करजगावच्या ९ जागांपैकी प्रभाग १ व ३ मधील ६ जागांवर सदस्य बिनविरोध निवडून आले. प्रभाग २ मधील ३ जागांवर ५ उमेदवार रिंगणात आहेत. टाळसुरे ग्रामपंचायतीच्या ९ जागांपैकी प्रभाग १ व २ मधील ६ जागांसाठी १० उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग ३ मधील ३ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. उंबरशेतच्या ९ जागांपैकी प्रभाग १ मधील ३ सदस्य बिनविरोध निवडून आले असून प्रभाग २ व ३ मधील ६ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात आहेत. उसगावच्या ७ जागांवर १४ उमेदवार रिंगणात आहेत. जालगावच्या १७ जागांपैकी २ सदस्य बिनविरोध निवडून आले असून उर्वरित १५ जागांसाठी २७ उमेदवार रिंगणात आहेत.

Web Title: ratnagiri news Grampanchayat Election