दापोलीत ६१ उमेदवार रिंगणात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 ऑक्टोबर 2017

दाभोळ - दापोली तालुक्‍यात ३० पैकी १२ ग्रामपंचायती सरपंचांसह बिनविरोध झाल्या असून ५ ग्रामपंचायतींमधील सर्व सदस्य बिनविरोध निवडून आले. सोमवारी (ता. १६) मतदान होणार आहे. निवडणूक विभाग सज्ज झाल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार विकास गारुडकर यांनी दिली.

दाभोळ - दापोली तालुक्‍यात ३० पैकी १२ ग्रामपंचायती सरपंचांसह बिनविरोध झाल्या असून ५ ग्रामपंचायतींमधील सर्व सदस्य बिनविरोध निवडून आले. सोमवारी (ता. १६) मतदान होणार आहे. निवडणूक विभाग सज्ज झाल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार विकास गारुडकर यांनी दिली.

तालुक्‍यातील दमामे, सडवे, देगाव, शिरसाडी, आगरवायंगणी, कोळबांद्रे, उंबर्ले, वेळवी, विरसई, करंजाणी, पाचवली व भडवळे या ग्रामपंचायतींची निवडणूक सरपंचपदासह बिनविरोध झाली. कादिवली, कळंबट, हातीप, सारंग, मुर्डी  या ग्रामपंचायतीमधील सर्व सदस्य बिनविरोध निवडून आले असून, या ठिकाणी केवळ सरपंचपदासाठी निवडणूक होईल. 

सोवेली, उसगाव, जालगाव, उंबरशेत, आपटी, करजगाव, बोंडीवली, वांझळोली, टाळसुरे, सातेरे तर्फे नातू, देहेण, कुडावळे, शिर्दे या १३ ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदासह २९ प्रभागात ६१ सदस्यांसाठी ही निवडणूक होणार आहे. एकूण १८ ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठी ४३ तर ६१ ग्रामपंचायत सदस्यांसाठी १३६ उमेदवार रिंगणात आहेत. ५७ मतदान केंद्रे असून २५२ कर्मचारी, ५७ पोलिस तसेच ५७ शिपाई अशा कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती केली आहे. १८ निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामपंचायतींच्या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत. दापोली शहराजवळील जालगाव, उंबरशेत, करजगाव, उसगाव या ग्रामपंचायतींसाठी तसेच कादिवली कळंबट व हातीप व सारंग लढतीकडे लक्ष लागले आहे.

खेडमधील निवडणूक शिवसेनेकडून प्रतिष्ठेची
खेड,- तालुक्‍यातील दहा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत शिवसेनेचे पारडे जड आहे. चिंचवली ग्रामपंचायतीचा सरपंच बिनविरोध निवडून आल्यामुळे ती जागा शिवसेनेकडे आली आहे. तिसंगी, संगलट, भोस्ते या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत चुरस निर्माण झाली. या ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादी म्हणजे गाव पॅनेलतर्फे निवडणुका लढल्या जातात. भेलसई, घाणेखुंट, निळीक, अलसुरे, कोंडिवलीमध्ये आज जाहीर प्रचार थांबला. शिवसेनेने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी पाठ फिरवल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाराज आहेत. आमदार संजय कदम यांचा प्रभाव किती पडतो ते पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Web Title: ratnagiri news Grampanchayat Election