रिफायनरी विरोधातील गावपॅनेल विजयी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

राजापूर -  तालुक्‍यात शुक्रवारी (ता. २७) झालेल्या चार ग्रामपंचायत निवडणुकांत शिवसेनेने बाजी मारीत तीन ग्रामपंचायतींवर भगवा फडकवला. रिफायनरी प्रकल्पविरोधावरून प्रतिष्ठेची ठरलेल्या व जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या नाणार ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी गाव पॅनेलचे ओंकार प्रभुदेसाई विजयी झाले.

राजापूर -  तालुक्‍यात शुक्रवारी (ता. २७) झालेल्या चार ग्रामपंचायत निवडणुकांत शिवसेनेने बाजी मारीत तीन ग्रामपंचायतींवर भगवा फडकवला. रिफायनरी प्रकल्पविरोधावरून प्रतिष्ठेची ठरलेल्या व जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या नाणार ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी गाव पॅनेलचे ओंकार प्रभुदेसाई विजयी झाले. राजापूर तहसील कार्यालयात शनिवारी (ता. २८) मतमोजणी झाली. यामध्ये मिठगवाणे, वाटुळ, हातिवले या गावच्या सरपंच व सदस्यांसमवेत नाणार गावच्या सरपंचपदाच्या निवडणुकीचा सामावेश होता.

तालुक्‍यात दुसऱ्या टप्प्यातील सहा ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती; मात्र त्यापैकी कळसवली व हसोळ तर्फे सौंदळ ग्रामपंचायती बिनविरोध ठरल्या. नाणारमध्ये सात जागा बिनविरोध झाल्या होत्या. तर दोन जागा रिक्त होत्या. त्यामुळे तेथे केवळ सरपंचपदासाठी निवडणूक झाली. नाणार परिसरात होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पाला विरोध करीत तेथील जनतेने गाव पॅनेल करून निवडणूक लढविली. त्यामध्ये गावपॅनेलचे ओंकार प्रभुदेसाई यांच्यासह मज्जीद भाटकर व रमेश किरकिरे यांनी निवडणूक लढविली. त्यामध्ये प्रभुदेसाई यांना ६४७, भाटकरना ३२७, तर किरकिरे यांना २८२ मते मिळाली. प्रभुदेसाई विजयी झाले.

वाटूळ ग्रामपंचायतीतअंतर्गत असलेली बंडखोरी मोडीत काढत शिवसेनेने बाजी मारली. सेनेचे सरपंचपदाचे उमेदवार अभय चव्हाण हे ६९ मतांनी विजयी झाले. त्यांना ३१५ मते मिळाली. त्यांच्या विरोधातातील माजी जि. प. सदस्या सौ. नीता नवीनचंद्र चव्हाण यांना २४६ मते मिळाली, संतोष श्रीधर चव्हाण यांना २१० मते मिळाली. वाटूळमधून सदस्य म्हणून विजय शंकर चव्हाण, अर्चना एकनाथ माटल, वर्षा कृष्णा चव्हाण, प्रकाश मांडवकर, राजेश्री घडशी, सतीश गुरव व स्नेहल चव्हाण असे सदस्य विजयी झाले.

मिठगवाणे ग्रामपंचायत निवडणुकीत दोन उमेदवारात सरळसरळ लढत होती. त्यामध्ये बलवंत गणपत सुतार व संतोष शिवाजी जैतापकर यांच्यातील लढतीत सुतार ३६ मतांच्या आघाडीने विजयी झाले. सुतार यांना ३८५ मते, तर जैतापकर यांना ३४९ मते मिळाली. मिठगवाणेतून सदस्य म्हणून भालचंद्र चेऊलकर, सूर्यकांत बर्गे, जान्हवी गावकर, सत्यवान आडिवरेकर, अमृता आडिवरेकर, मनिषा जैतापकर, संतोष पाटणकर, आशा काजवे व साक्षी कांबळी हे सदस्य विजयी झाले. 

कळसवली व हसोळतर्फे सौंदळ या दोन्ही ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. त्यामध्ये कळसवलीच्या सरपंचपदी श्रृती सुनील चव्हाण या बिनविरोध ठरल्या. सदस्यांमध्ये विजय चंद्रकांत नकाशे, गोपीनाथ नारायण आमटे, प्राजक्ता प्रदीप पांचाळ, प्रांजली बिपिन जाधव, वैभव श्रीकांत ठाकुरदेसाई, विद्या विकास चव्हाण, जानू गोविंद सुवरे, अनिता शंकर शेडेकर व मनस्वी मनोहर शेडेकर यांचा बिनविरोध सदस्य म्हणून सामावेश आहे.

हसोळतर्फे सौंदळच्या सरपंचपदी श्रेया संतोष जाधव या बिनविरोध निवडून आल्या. सदस्य म्हणून अजिम कादर नाईक, अस्मिता नारायण जाधव, अनिता रवींद्र कुळ्ये, रमेश अनंत सौंदाळकर, अरुण मनोहर शिंदे, सुगंधा सुरेश पाटणकर, सुधीर श्रीधर पोटले, वैशाली विठोबा लाड या सदस्य म्हणून बिनविरोध निवडून आल्या. या ग्रामपंचायतीत एक जागा रिक्त आहे.

निकालानंतर शिवसेनेने चारपैकी तीन ग्रामपंचायती (वाटूळ, मिठगवाणे व हातिवले) व दोन्ही बिनविरोध आलेल्या ग्रामपंचायती (कळसवली व हसोळ तर्फे सौंदळ) आपल्या असल्याचा दावा केला आहे, तर नाणार ग्रामपंचायत ही गाव पॅनेलची राहील असे स्पष्ट केले आहे. निवडणुकीतील 
विजयानंतर विजयी सरपंच व सदस्यान्नी जोरदार जल्लोष केला. या वेळी कायदा सुव्यवस्था चोख ठेवली होती. 

सात महिलांमध्ये लढत
हातिवले ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडणुकीत सात महिला उभ्या होत्या. त्यामध्ये सायली संदेश धालवलकर विजयी झाल्या. त्यांनाना ११४ मते मिळाली. सोनल शिवकुमार गोसावींना ३५, संजना संजय भामत यांना २५, जान्हवी उदय धालवलकर यांना ७६, अंकिता अरविंद पवार यांना ५५, स्मिता राजेंद्र पवार यांना ३५, प्रिया प्रमोद शिंदे यांना ७६ मते पडली. संतोष आत्माराम धालवलकर व प्रभाकर धावडे हे दोघे सदस्यपदी विजयी झाले. या ग्रामपंचायतीच्या बाकी जागा बिनविरोध ठरल्या.

Web Title: ratnagiri news Grampanchayat Election