रत्नागिरी तालुक्यातील 29 पैकी 23 ग्रामपंचायतींवर सेनेचा भगवा

राजेश कळंबटे
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

रत्नागिरी - तालुक्यातील 29 पैकी 23 ग्रामपंचायतींवर भगवा फडकला, तर सहा ठिकाणी कमळ फुलल्याचा दावा भाजपने केला आहे. समान मते पडल्याने तोणदेत सरपंचपदासाठी काढण्यात आलेला चिठ्ठीचा कौल शिवसेनेला मिळाला. दोन सदस्यांसाठी घेण्यात आलेला कौलही शिवसेना पारड्यात पडला.

रत्नागिरी - तालुक्यातील 29 पैकी 23 ग्रामपंचायतींवर भगवा फडकला, तर सहा ठिकाणी कमळ फुलल्याचा दावा भाजपने केला आहे. समान मते पडल्याने तोणदेत सरपंचपदासाठी काढण्यात आलेला चिठ्ठीचा कौल शिवसेनेला मिळाला. दोन सदस्यांसाठी घेण्यात आलेला कौलही शिवसेना पारड्यात पडला.

तालुक्यातील 244 पैकी 193 सदस्यांच्या जागांवर शिवसेनेने, 51 जागांवर भाजपने दावा केला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला एकही ग्रामपंचायत ताब्यात घेता आलेली नाही.

येथील सामाजिक न्यायभवनात ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी झाली. तेथे शिवसेना-भाजपचे अनेक कार्यकर्ते गर्दी करुन होते. त्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा भरणा अधिक होता. सुरवातीला मावळंगे ग्रामपंचायतीचा निकाल लागला. तेथे भाजपचा उमेदवार निवडून आला. मोजणीच्या सुरवातीलाच यश मिळाल्याने शिवसेनेच्या गोटात शांतता होती; मात्र त्यानंतर सर्वच ग्रामपंचातींवर शिवसेनेने बाजी मारली. त्यामुळे शिवसैनिकांनी जल्लोश केला. शिवसेनेकडून 23 ग्रामपंचायतींवर दावा केला आहे. त्यात वेळवंड, वळके, निरुळ, करबुडे, बोंड्ये, निवेंडी, सत्कोंडी, जांभरुण, धामणसे, मालगुंड, गावडेआंबेरे, चांदोर, टिके, टेभ्ये, केळ्ये, वेतोशी, तोणदे, निवळी यांचा समावेश आहे. भाजपने सहा सरपंचपदांवर दावा केला आहे. त्यात भगवतीनगर, पिरंदवणे, कासारवेली, गणेशगुळे, पूर्णगडे, मावळंगे ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

मावळंगेतील सदस्यपदाच्या एका जागेसाठी सेनेचे मिलिंद एकनाथ करकरी आणि कमलाकर थुळ यांना 149 मते, गावडेआंबेरेत सेनेचे बळीराम सोनू डोंगरे आणि महेश यशवंत गुरव यांना प्रत्येकी 180 आणि तोणदेत सरपंचपदासाठी संजय पुसाळकर आणि सचिन भुवड यांना 375 अशी समान मते पडली होती. निवडणूक निर्णय अधिकारी मच्छींद्र सुकटे यांनी तिन्ही निकाल राखून ठेवले. त्यांचा निकाल चिठ्ठीवर काढण्यात आला. त्यात शिवसेनेचे मिलिंद करकरी, बळीराम डोंगरे आणि सचिन भुवड निवडून आले. ही चिठ्ठी साक्षी सुर्वे हीने काढल्यामुळे शिवसेनेसाठी तिची साक्ष महत्त्वाची ठरली.

तालुक्यातील भाजपच्या ताब्यातील धामणसे शिवसेनेने बळकावली. कासारवेली, गणेशगुळे या दोन ग्रामपंचायतीही भाजपने ताब्यात घेत शिवसेनेला धक्का दिला. वेतोशी आणि चांदोरसह मालगुंडमध्ये भाजपने हवा निर्माण केली होती; परंतु शिवसेनेने तेथे गड राखला. प्रतिष्ठेच्या मालगुंडमध्ये शिवसेनेला भाजपने चांगली झुंज दिली. तेथे सरपंचपदाचा उमेदवार 115 मतांनी निवडून आला. निवळीत भाजपचा उमदेवार 100 मताने पराभूत झाला. भाजपचे वर्चस्व असलेल्या ग्रामपंचायतींत दोनने वाढ झाली. पूर्णगड आणि विल्ये या दोन ठिकाणी गावपॅनेल उभी होती. त्यावर भाजपकडून दावा करण्यात आला

Web Title: ratnagiri news Grampanchayat Election result