रत्नागिरीत विराट स्वागतयात्रेने हिंदू नवववर्षाचे स्वागत

मकरंद पटवर्धन
रविवार, 18 मार्च 2018

रत्नागिरी - येथे गुढीपाडवा व नववर्षाच्या निमित्ताने विराट स्वागत यात्रेचे आयोजन केले होते. ग्रामदैवत श्री भैरी मंदिरातून निघालेली स्वागतयात्रा आणि मारुती मंदिरपासून निघालेली यात्रा जयस्तंभ येथे एकत्र आल्यानंतर जल्लोषी स्वागत करण्यात आले. केरळी बांधवांच्या वाद्यवृंदाने शोभा वाढली. 56 चित्ररथांमध्ये सामाजिक संदेश व स्वच्छ रत्नागिरीचा संदेश देणारे रथही होते.

रत्नागिरी - येथे गुढीपाडवा व नववर्षाच्या निमित्ताने विराट स्वागत यात्रेचे आयोजन केले होते. ग्रामदैवत श्री भैरी मंदिरातून निघालेली स्वागतयात्रा आणि मारुती मंदिरपासून निघालेली यात्रा जयस्तंभ येथे एकत्र आल्यानंतर जल्लोषी स्वागत करण्यात आले. केरळी बांधवांच्या वाद्यवृंदाने शोभा वाढली. 56 चित्ररथांमध्ये सामाजिक संदेश व स्वच्छ रत्नागिरीचा संदेश देणारे रथही होते.

ग्रामदैवत श्री भैरी मंदिरात सकाळी गुढी उभी करून व गाऱ्हाणे घालून स्वागतयात्रेला प्रारंभ झाला. ढोल-ताशांचा गजर, भजने आणि हिंदू नववर्षाच्या एकमेकांना शुभेच्छा देत सुरवात झाली. यात्रेत नगारा, ढोलपथक, श्री भैरी मूर्ती, अप्पा जोशी स्मृती चित्ररथ, अखिल हिंदू गणेशोत्सव मंडळ, शहर व्यापारी संघ, राम मंदिर, ढोलपथक, पालखी, नवरात्र उत्सव मंडळ घुडेवठार- छत्रपती शिवाजी महाराज देखावा, खल्वायन, कचरा निर्मूलन करणारा माणूस, लक्ष्मीकांत रवळनाथ देवस्थान भाट्ये, मांडवी मित्रमंडळ- मासेमारी, स्वयंभू काशीविश्‍वेश्‍वर, मराठा मंदिर, ढोल पथक, ब्राह्मण हितवर्धिनी, चित्पावन ब्राह्मण संघ व ब्राह्मण जागृती सेवा संघ- शनिवारवाडा व बाजीराव पेशवे प्रतिकृती, पतंजली योग समिती, महिषासुरमर्दिनी, इलेक्‍ट्रिक असोसिएशन, विठ्ठल मंदिर संस्था, राष्ट्रसेविका समिती, नगरपालिका आदींचे विविध रथ, वाहने स्वागतयात्रेत सहभागी झाले. पाटीदार समाजाने एसटी स्टॅंडवर पाणी, सरबत वाटप, हॉटेल विवेकतर्फे ताक वाटप केले.

नगराध्यक्ष राहुल पंडित हे फेटा, जॅकेट घालून घोड्यावर स्वार झाले होते. मारुती मंदिरपासून निघालेल्या यात्रेत भारतमाता चित्ररथ, केरळी वाद्यवृंद, शिवाजी महाराजांचा चित्ररथ, महाबली व गणपती चित्ररथ, तैलिक समाज, जनहित मित्रमंडळ, सनातन संस्था, हिंदू जनजागृती प्रणीत रणरागिणी शाखा, श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र- मल्हार नवस चित्ररथ, आंतरराष्ट्रीय कृष्ण भवनामृत- श्रीकृष्ण अर्जुन चित्ररथ, पांचाळ सुतार सेवा संघ- सुतारकाम कला प्रदर्शन, शिवरुद्र ढोल पथक, क्षत्रिय मराठा मंडळ- शिवराज्याभिषेक, ओम साई मित्रमंडळ- वृक्षारोपण, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान- छत्रपती संभाजी महाराज, हिंदवी स्वराज्य सुवर्ण सिंहासन पुनर्स्थापना, दधनगर समाज संघ- स्त्री भ्रूण हत्या, ऍड. बाबासाहेब नानल गुरुकुल- झांजपथक, योगासने प्रात्यक्षिक, श्री हनुमान मंदिर, सडा, साई सेवा मित्रमंडळ, नाचणे- गजानन महाराज देखावा, बंजारा समाज-बंजारा वेशभूषा, क्रांतीनगर मित्रमंडळ, जनजागृती सेवा संघ, हर्षा मोटार ट्रेनिंग स्कूल, अद्वैत उद्योग समूह, रत्नागिरी नगरपालिका यांचा समावेश होता.

स्वच्छ रत्नागिरीसाठी नगराध्यक्ष सहभागी

स्वागतयात्रेमध्ये विविध सामाजिक संदेश देणारे चित्ररथ, फलक प्रदर्शित झाले. क्‍लिन रत्नागिरी, आपली रत्नागिरीचा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नगराध्यक्ष राहुल पंडित यात्रेत सहभागी झाले. स्वच्छ रत्नागिरीसाठी त्यांनी पालिकेची गाडी सर्वांत मागे ठेवली. त्यासोबत चार सफाई कर्मचारी होते. त्यामुळे यात्रेदरम्यान कचरा सफाईसुद्धा तत्काळ करण्यात आली. यामुळे नगराध्यक्षांचे विशेष कौतुक करण्यात आले. 

Web Title: Ratnagiri News Gudipadava New year celebration