रत्नागिरीत साहित्यिक गुढी..

अमोल कलये
रविवार, 18 मार्च 2018

रत्नागिरी - रत्नागिरीत प्रथमच साहित्यिक गुढी उभारण्यात आली आहे. येथील जनसेवा ग्रंथालयाच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

रत्नागिरी - रत्नागिरीत प्रथमच साहित्यिक गुढी उभारण्यात आली आहे. येथील जनसेवा ग्रंथालयाच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

गुढीपाडव्याच्या निमित्ताने साहित्य, वाचन चळवळीच्या विकासासाठी जनसेवा ग्रथालयाच्यावतीने ही गुढी उभारण्यात आली आहे..

साहित्यिकांना लिखाणाची प्रेरणा मिळावी, रत्नागिरीतील साहित्यिक चळवळ वृद्धीगत व्हावी, या उद्देशाने ही साहित्यिक गुढी उभारण्यात आली आहे.
- प्रकाश दळवी,

अध्यक्ष, जनसेवा ग्रंथालय..

गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी ही साहीत्यिक गुढी उभारुन साहीत्य चळवळीची मुहूर्तमेढ ग्रंथसेवा ग्रंथालयाने उभारली आहे. पारंपारिक पद्धतीने या गुढीचे पुजन करण्यात आले. त्याचबरोबर ग्रंथाचे पुजन देखील करण्यात आले. गुढीला पुस्तकांच्या माळा देखील लावण्यात आल्या आहे. अशी आगळीवेगळी गुढी उभारून साहित्यिकांना प्रेरणा देण्याचे काम या ग्रंथालयाकडून करण्यात येत आहे. कोकणातील हा पहिलाच उपक्रम आहे.

 

Web Title: Ratnagiri News Gudipadva Literature Gudi