गुहागरात भास्कर जाधव यांना, देवरुखात शिवसेनेला धक्का

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

रत्नागिरी - शिवसेना, भाजपसह राष्ट्रवादीनेही प्रतिष्ठेच्या केलेल्या देवरूख व गुहागर नगरपंचायतीचे निकाल धक्कादायक लागले आहेत. देवरूख नगरपंचायतीत कमळ अनपेक्षितरीत्या फुलले, तर गुहागरमध्ये कुुणबी समाजाचे प्राबल्य असलेल्या शहर विकास आघाडीने बाजी मारली. शिवसेनेने डावपेचात राजकीय शहाणपण दाखवून शहर विकास आघाडीची साथ दिल्यामुळे तेथे शिवसेना सत्तेवर आली आहे.

देवरूख नगराध्यक्षपदी भाजपच्या मृणाल शेट्ये, तर गुहागरमध्ये शहर विकास आघाडीचे राजेश बेंडल विजयी झाले. आमदार भास्कर जाधव यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. शहर विकास आघाडीत फूट पडण्यापासून ते प्रत्यक्ष मतदारांच्या भेटीगाठी घेण्यापर्यंत सारे डावपेच राष्ट्रवादीने वापरले होते. मात्र जाधव यांचा करिष्मा येथे चालला नाही.

देवरुखातील पराभव हा शिवसेनेला धक्का आहे, तर भाजपला मिळालेला विजय हा एक बुस्टर मानला जातो. जिल्हाध्यक्ष बाळ माने यांच्यासाठी हा विजय दिलासादायी आहे. रत्नागिरीतील पोटनिवडणुकीत अपेक्षेप्रमाणे राजन शेट्ये या शिवसेनेच्या उमेदवाराने बाजी मारली. ते 187 मतांनी विजयी झाले. त्यांना 986, भाजपचे वसंत पाटील यांना 797, तर कॉंग्रेस आघाडीचे सनिफखान गवाणकर यांना 101 मते मिळाली.

देवरुखातील विजयी उमेदवार

प्रभाग 1 - प्रकाश मोरे (शिवसेना), 2- आश्विनी पाताडे (भाजप), 3- रेश्‍मा किर्वे (भाजप), 4- वैभव पवार (शिवसेना), 5- संतोष केदारी (भाजप), 6- प्रफुल्ल भुवड (राष्ट्रवादी), 7- सुशांत मुळ्ये (भाजप), 8- अनुष्का टिळेकर (शिवसेना), 9- प्रतीक्षा वणकुद्रे (कॉंग्रेस), 10- उल्हास नलावडे (राष्ट्रवादी), 11- प्रेरणा पुसाळकर (राष्ट्रवादी), 12- सान्वी संसारे (मनसे), 13- वैभव कदम (भाजप), 14- धनश्री आंबेकर (भाजप), 15- निदा कापडी (शिवसेना), 16- राजेंद्र गवंडी (भाजप), 17- वैभवी परशराम (अपक्ष).

गुहागर नगरपंचायतीत शहर विकास आघाडीला 9, शिवसेनेला 1, भाजपला 6, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला 1 जागा मिळाली. या आधी राष्ट्रवादी कॉंग्रेसची तेथे नगरपंचायतीची सत्ता होती.

Web Title: Ratnagiri News Guhagar, Devrukh Nagarpanchayat Election