नगराध्यक्षपदासाठी गुहागरमध्ये दुरंगी लढत 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 मार्च 2018

गुहागर - येथील नगरपंचायत निवडणुकीत 17 प्रभागांसाठी 30, तर नगराध्यक्षपदासाठी 2 उमेदवारी अर्ज दाखल झाले. सत्ताधारी राष्ट्रवादीने 11 नंबर प्रभागात अर्ज न भरता छुपा पाठिंबा दिला आहे.

गुहागर - येथील नगरपंचायत निवडणुकीत 17 प्रभागांसाठी 30, तर नगराध्यक्षपदासाठी 2 उमेदवारी अर्ज दाखल झाले. सत्ताधारी राष्ट्रवादीने 11 नंबर प्रभागात अर्ज न भरता छुपा पाठिंबा दिला आहे.

भाजपला चार प्रभागांत सक्षम उमेदवार मिळाले नाहीत. शिवसेनेने शहर विकास आघाडीजवळ युती असल्याचे सांगत नगराध्यक्षपदी उमेदवार दिला नाही. तसेच नऊ प्रभागांत एकही अर्ज भरलेला नाही. उमेदवारांअभावी दुसऱ्या प्रभागातील उमेदवारास संधी देण्याचा निर्णय आयत्यावेळी घ्यावा लागला आहे. 

सत्ताधारी राष्ट्रवादीने सतरा प्रभागांपैकी शिल्लक राहिलेल्या चार प्रभागांमधील एक रिक्‍त ठेवला असून उर्वरित तीन प्रभागांमधून दुसऱ्या प्रभागातील आयात उमेदवार दिले. चार प्रभागांत अतिरिक्‍त उमेदवारी अर्ज दाखल केले. राष्ट्रवादीने प्रभाग 14 मध्ये अनिकेत प्रकाश जाधव, प्रभाग 6 व 10 मध्ये माजी नगराध्यक्ष जयदेव मुरलीधर मोरे, प्रभाग 13 मध्ये संगीता संजय वराडकर, प्रभाग 1 मध्ये विद्यमान महिला बालकल्याण सभापती निधी नितीन सुर्वे, प्रभाग 3 मध्ये वर्षा दत्ताराम गिजे व दक्षता दिगंबर शेटे यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. 

भाजपने प्रशांत शिरगावकर, रामदास राणे व सुरेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली फेरी काढत उमेदवारी अर्ज दाखल केले. नगराध्यक्षपदासाठी रवींद्र यशवंत बागकर यांना उतरविले आहे. 13 प्रभागांतील काही जागांवर आयात उमेदवार दिले.

प्रभाग 3 मध्ये अनघा सुहास कचरेकर, प्रभाग 7 मध्ये स्मिता रहाटे, प्रभाग 4 मध्ये श्रद्धा भोसले, प्रभाग 12 मधून भाग्यलक्ष्मी कानडे, प्रभाग 14 मधून संजय मालप, प्रभाग 10 मधून प्रकाश रहाटे, प्रभाग 17 मधून मृणाल गोयथळे, प्रभाग 1 मधून दीपाली मोरे, प्रभाग 9 मधून स्नेहल वरंडे, प्रभाग 2 मधून उमेश भोसले, प्रभाग 8 मधून अरुण रहाटे, प्रभाग 6 मधून गजानन वेल्हाळ तर प्रभाग 5 मधून समीर घाणेकर यांचे अर्ज दाखल केले. 

प्रभाग 16 मधील गुंता कायम आहे. शिवसेनेने प्रभाग 6 मध्ये विलास वाघधरे, 7 मध्ये नीलिमा गुरव, 8 मध्ये अंकुर रहाटे, प्रभाग 12 मधून रश्‍मी भावे, 5 मध्ये शैलेश भोसले, 16 मध्ये संतोष गोयथळे, 1 मधून प्राची आरेकर, 2 मधून राकेश साखरकर यांना उमेदवारी दिली. नगराध्यक्षपदासाठी राजेंद्र सीताराम आरेकर यांनी अपक्ष म्हणून उडी घेतली.

माजी नगराध्यक्षा स्नेहा जनार्दन भागडे यांनी सोमवारी 11 नंबर प्रभागासाठी दुसरा नवीन अर्ज दाखल केला आहे. प्रभाग 16 मध्ये योगेश प्रताप गोयथळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गुहागरमध्ये 17 प्रभागांसाठी तब्बल 55 तर नगराध्यक्षपदासाठी 5 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. 

Web Title: Ratnagiri News Guhagar Nagar Panchayat Election

टॅग्स