सागरी महामार्गावर अडीच हजार धावपटू

सागरी महामार्गावर अडीच हजार धावपटू

रत्नागिरी -  गणपतीपुळे ते जयगड सागरी महामार्ग. त्यात कडाक्‍याची थंडी आणि झोंबणारा गार वारा अशा वातावरणाचा आनंद घेत हजारो धावपटूंनी हाफ मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण केली.

एकवीस किमीची ही मॅरेथॉन स्पर्धा १ तास २ मिनिटे ५२ सेकंदांत पूर्ण करण्याची कामगिरी कोल्हापूरच्या दीपक बापू कुंभार यांनी केली. कोकण किनारा हाफ मॅरेथॉन आणि क्रॉसकंट्री स्पर्धेत कोकण, कोल्हापूर विभागातील दोन हजार पाचशे नव्वद धावपटूंनी सहभाग घेतला होता.

हाफ मॅरथॉन स्पर्धेचा प्रारंभ सकाळी साडेसहा वाजता झाला. गणपतीपुळे, मालगुंड, वरवडे, उंडीमार्गे जय गणेश मंदिर अशी एकवीस किमी अंतर होते. या स्पर्धेतील विजेत्यांचा पारितोषिक समारंभ जय गणेश मंदिराजवळ झाला. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक प्रणय अशोक, जेएसडब्ल्यूचे गिरीश देशमुख, जिल्हा क्रीडाधिकारी मिलिंद दीक्षित, यतिश छाब्रा, वीणा छाब्रा, श्री. शर्मा, सुरेश कुमार, ईश्‍वरी शर्मा, नवीन कुमार, कॅ. रवी, लावण्या रवी, एचआर हेड विजय वाघमारे, पोलिस उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे, ॲथलेटिक असोसिएशनचे संदीप तावडे आदी उपस्थित होते.

२१ किमी खुला गट- पुरुष- (प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, पाचवा) ः दीपक कुंभार, सचिन पाटील, चंद्रकांत मानबाडकर, अमित पाटील, सुजीत गमरे. महिला ः मीनाक्षी पाटील, माधुरी देशमुख, अमृता दुबळे, प्रमिला पाटील, करिष्मा शेख. २१ किमी जेएसडब्ल्यू कर्मचारी ः किशन कुमार यादव, प्रणव बबनराव गोबाडे, मदन कुमार, सूरज दिलीप लोंगाडगे, श्रीकांत बेल्लूर.

१४ वर्षांखालील (मुली, ३ किमी) ः अर्ची तौसालकर, प्रिया मारुती चव्हाण, ज्योती राजभर, समीक्षा जयराम. मुले- रविराज अमणे, अभिजित रामनवकटी, सम्राज आनंदा धोंड, नंदुलाल बारीक, विजय भोसले. चौदा वर्षांखालील मुले- ओंकार पन्हाळकर, आकाश टिपरे, रोहित नलावडे, ओंकार विष्णू बैकर, तुराज हुमणे. मुली- पूजा गंगापुरे, आयशा वंटमुरेकर, श्‍वेता बैकर, स्नेहल गुरव, अस्मिता शिगवण.

जेएसडब्ल्यू कर्मचारी (६ किमी)- राहुल, सिद्धेश सुर्वे, त्रिलोचन महंता, सतीश गोणबरे, चंद्रप्रकाश पांडे. खुला गट- महिला ६ किमी ः सोनाली देसाई, दिव्या भोरे, कविता भोईर, निकिता भोंगार्ड, अमिषा मांजरेकर. मुले- अक्षय अलांडे, रामदास पाटील, करण माळी, जगदीश गावडे, रामू पारधी.

१७ वर्षांखालील ६ किमी- विवेक मोरे, ओंकार कुंभार, महादेव कुंभार, शुभम मडवी, प्रथमेश तामकर. मुली- साक्षी जड्यार, भक्‍ती पाटील, प्रीती चव्हाण, अर्चना कुंताडे, सानिका पोस्तुरे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com