राजापूरचे नगराध्यक्ष काझी यांचा राजीनामा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

रत्नागिरी - राजापूरचे नगराध्यक्ष हनिफ मुसा काझी यांनी आज पदाचा राजीनामा जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांच्याकडे दिला. उच्च न्यायालयाने जातपडताळणी प्रमाणपत्र अवैध ठरविल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचे समजते. थेट नगराध्यक्ष म्हणून ते निवडून आले होते. त्यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. 

नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीमध्ये हनिफ काझी हे ओबीसी प्रवर्गातून २०१६ मध्ये निवडून आले होते. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार अभय मळेकर यांचा पराभव केला होता. राजापूर प्रांतांनी त्यांना जातप्रमाणपत्र दिले होते. याबाबत सेनेच्या विरोधकांनी आक्षेप नोंदवला होता. येथील समाजकल्याण विभागाच्या जातपडताळणी समितीकडून जातीच्या प्रमाणपत्राची चौकशी करून ते जातप्रमाणपत्र अवैध ठरविल होते. नगराध्यक्ष हनिफ काझी यांनी समितीच्या निकालाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील केले होते. न्यायालयाने समितीचा निर्णय कायम ठेवत प्रमाणपत्र अवैध ठरविले. त्यामुळे अपात्र होण्याची दाट शक्‍यता होती. 

हनिफ काझी यांनी आज जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांच्याकडे नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसचे येथे पारडे जड असले तरी सेनेलाही संधी आहे. त्यामुळे पुढील मोर्चेबांधणीसाठी पक्षांनी हालचाली सुरू केल्या आहेत.

Web Title: Ratnagiri News Hanif Musa Kazhi resign