हापूस कॅनिंगला किलोला 30 रुपये

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

रत्नागिरी - उत्पादन कमी असल्याने बाजारातील दर वधारलेले असूनही जिल्ह्यात आंबा कॅनिंगला सुरुवात झाली. दररोज सुमारे ५० टन आंबा कॅनिंगसाठी परजिल्ह्यात जातो. प्रारंभीचा किलोला ३० दर रुपये मिळाला आहे.

रत्नागिरी - उत्पादन कमी असल्याने बाजारातील दर वधारलेले असूनही जिल्ह्यात आंबा कॅनिंगला सुरुवात झाली. दररोज सुमारे ५० टन आंबा कॅनिंगसाठी परजिल्ह्यात जातो. प्रारंभीचा किलोला ३० दर रुपये मिळाला आहे.

रत्नागिरीतून प्रक्रिया करण्यासाठी गुजरात, बलसाड, नाशिक, जळगावात विविध कंपन्यांना पाठविला जातो. यावर्षी उत्पादन कमी असल्यामुळे १५ एप्रिलपासून आंबा प्रक्रियेसाठी मिळू लागला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात वीस कॅनिंग व्यावसायिक आहेत. जिल्ह्यातून १५ ते २० गाड्यांमधून दररोज ५० टनापर्यंत आंबा कॅनिंगसाठी विविध कंपन्यांकडे पाठविला जातो. गतवर्षी आंबा अधिक असल्याने एप्रिलमध्ये कॅनिंगला सुगीचे दिवस होते. यावर्षी चाळीस टक्‍के घट असल्याने बाजारात दर चांगला मिळतो.

दोन दिवसांत हा दर दोन रुपयांनी खाली आला आहे. मात्र दर २५ रुपयांपेक्षा खाली उतरणार नाही, असा अंदाज आहे. गतवेळी ३२ ते ३४ रुपये किलोने दर सुरु झाला तो अखेरच्या क्षणी २० रुपयांपर्यंत उतरला होता. दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी बाजार समितीने समन्वयासाठी बैठकीचे आयोजन केले होते. त्यामध्ये कॅनिंग व्यावसायिक,आंबा बागायतदार आणि कंपनी व्यवस्थापक यांना निमंत्रित केले होते. यावेळीही बाजार समिती लक्ष घालेल अशी आशा बागायतदाना आहे.

सुरुवातीला मिळालेला दर सध्या समाधानकारक आहे. उत्पादन कमी असल्याने दरातील घसरण कमी राहील.
- डॉ. विवेक भिडे, 
   बागायतदार

गतवर्षी किलोला ३२ ते ३४ रुपये इतका दर होता. यावर्षी सुरुवातीला ३० रुपये दर मिळाला असून कॅनिंगला आंबा कमी आहे.
- राजू मयेकर, 
   कॅनिंग व्यावसायिक

Web Title: Ratnagiri News Hapus canning 30 rs per KG