हापूसची पहिली पेटी मुंबईला रवाना

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

रत्नागिरी - हापूस आंब्याची पहिली पेटी दापोली तालुक्‍यातून मुंबईला रवाना झाली. त्याचबरोबर रत्नागिरीतील उद्यमनगर परिसरातील काझी यांच्या बागेतील आंबा रत्नागिरीच्या स्थानिक बाजारात विक्रीसाठी दाखल झाला आहे. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी पंधरा दिवस उशिराने हापूस दाखल झाल्याचे विक्रेते सतीश पोवार यांनी सांगितले.

पहिल्या टप्प्यात अडीच डझन आंबा विक्रीसाठी ठेवला आहे. पाच डझनाच्या पेटीत बसेल एवढे मोठे फळ आहे. येत्या आठ दिवसांमध्ये आणखी 15 डझन आंबा विक्रीसाठी येईल. गेल्या चार दिवसांत उष्मा वाढू लागला आहे. त्यामुळे फळ वेगाने तयार होईल. त्यानंतर हापूसची आवक वाढेल; परंतु मागील हंगामाच्या तुलनेत या वर्षी जानेवारी महिन्यात येणारे उत्पादन अत्यंत कमी असेल. सुरवातीला साधारण अडीच ते तीन हजार रुपयांपर्यंत दर मिळेल, अशी अपेक्षा व्यक्‍त केली जात आहे.

Web Title: ratnagiri news hapus first box go to mumbai