मुंबई - गोवा महामार्गावर संगमेश्वरजवळ दरड कोसळून वाहतूक विस्कळीत

संदेश सप्रे
रविवार, 10 जून 2018

संगमेश्वर - मुंबई -गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सध्या वेगाने सुरु असताना येथील पावसाचा विचार न करता केलेली डोंगरांची कटाई पहिल्याच पावसात ठेकेदारांच्या अंगलट आली. उभे कापलेले डोंगर पहिल्याच मुसळधार पावसात आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कोसळल्याने संगमेश्वर नजिक कुरधूंडा आणि गावमळा येथील वाहतूक काही काळ ठप्प झाली. तातडीने दरड हटवण्याचे काम हाती घेतल्याने सुमारे तासाभराने या मार्गावर एकेरी वाहतूक मंदगतीने सुरु करण्यात आली आहे.

महामार्गाच्या चौपदरीकरणात रस्त्याकडेचे डोंगर खोदतांना त्यांना स्टेप देणे आवश्यक होते. मात्र बहुतांशी डोंगर उभे कापल्याने पहिल्याच मुसळधार पावसात संगमेश्वर नजिक गांवमळा आणि कुरधूंडा बंदर या दोन ठिकाणी दरड आणि माती रस्त्यावर आली. गांवमळा येथील नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्याचा भराव वाहून गेला, तर कुरधूंडा बंदर थांब्यानजिकच्या रस्त्यावर दगड माती आल्याने महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदारांनी तातडीने जेसीबी आणि अन्य यंत्रसामुग्रीच्या सहाय्याने दरड दूर करण्याचे काम हाती घेतले आणि तासाभरातच महामार्गावरील वाहतूक मंदगतीने आणि एकेरी पध्दतीने सुरु करण्यात आली आहे . 

पावसाचा जोर अद्याप कायम असल्याने ज्या ठिकाणी महामार्ग रुदीकरणाचे काम सुरु आहे अशा ठिकाणी दरडी कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहनचालकांनी वाहने सावकाश आणि काळजीपूर्वक चालवावी तसेच कोणताही धोका पत्करुन वाहन चालवू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे . 

Web Title: Ratnagiri News Heavy Rains affect traffic on Mumbai - Goa Road