रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा धुमाकुळ

राजेश कळंबटे, राजेश शेळखे
रविवार, 10 जून 2018

रत्नागिरी- जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ सुरु आहे. सलग दोन दिवस पावसाने झोडपले असून ठिकठिकाणी पाणी भरण्यासह दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली आहे.

रत्नागिरी- जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ सुरु आहे. सलग दोन दिवस पावसाने झोडपले असून ठिकठिकाणी पाणी भरण्यासह दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली आहे.

दरड काढण्याचे काम बांधकाम विभागाकडून सुरु आहे. रत्नगिरी शहरात बाजारपेठेत गटार तुंबल्यामुळे पाणी रस्त्यावर आले आहे. नगरपालिकेची स्वच्छता उघड्यावर पडली आहे.

पावसाचा धुमाकुळ...

 • संगमेश्वर तालुक्यात मौजे सोनगिरी येथील रामचंद्र लक्ष्मण शिंदे यांच्या घरावर दगड कोसळले
 • मुंबई गोवा मार्गावर चिपळूण नजीक झाड कोसळले
 • कुरधुंडा येथे दरड कोसळून वाहतूक ठप्प 
 • राई भातगाव मार्गावर दरड कोसळून वाहतूक ठप्प 
 • वायगणी येथे कोजवेवरून पाणी गेल्याने संपर्क तुटला
 • टेम्बपुलावरून पाणी गेल्यामुळे वाहतूक पूर्णतः थांबली आहे.
 • चिपळूण तालुक्यात मौजे कुटरे येथे महादेव धोंडकर यांचा गोठा कोसळून दोन बैल व एक वासरु जखमी,

 • रत्नागिरी - कापसाळ येथे रस्त्यावर वडाचे झाड पडल्याने वाहतूक ठप्प

 • मौजे चिपळूण- गुहागर मार्गावर चिपळूण - चवेली रात्रीची बस गोंधळे जवळ रस्त्यावर दरड कोसळल्यामुळे अडकून पडली 

 • रत्नागिरी तालुक्यात मौजे कुरणवाडी येथे दिपक शंकर धावडे यांच्या घरावर झाड कोसळून अंशत: नुकसान

 • मौजे रनपार येथे नंदकुमार ऊमाजी सुर्वे यांच्या घरात पाणी शिरले 
 • मौजे पेठ-पुर्णगड येथे रामा भेंढा डोर्लेकर यांच्या घरावर झाड पडल्याने नुकसान
 • मौजे कासारवेली येथे मराठी शाळेजवळ झाड पडले 
 • राजापूर तालुक्यात मौजे कशेळी येथे पांडूरंग विभिषन पाटील यांच्या गोठयाला शॉक सर्किटमुळे अचानक आग लागून गोठयाचे १२ हजार रुपयांचे नुकसान
 • मौजे राजापूर येथील राष्ट्रीय महामार्गावर झाड कोसळून वाहतूक ठप्प झाली होती.

रत्नागिरी जिल्हयात 10 जून 2018 रोजी एकूण 1155.00 मिलीमीटर म्हणजेच सरासरी 128.33 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

तालुका निहाय पावसाची आकडेवारी  अशी (आकडे मिलीमीटर मध्ये )  मंडणगड- 53.00 , दापोली- 77.00, खेड- 58.00, गुहागर-140.00, चिपळूण-111.00, संगमेश्वर-85.00, रत्नागिरी -239.00, लांजा 187.00 आणि राजापूर तालुक्यात 205.00 मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. 

 

Web Title: Ratnagiri News Heavy Rains in Ratnagiri Disitrict