‘बेटी बचाव, बेटी पढाव’साठी सर्वांच्या एकजुटीची गरज - डॉ. विनय नातू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017

गुहागर -  सरकार कोणाचेही असले तरी ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ या उपक्रमांसाठी पुरे पडू शकत नाही. त्यासाठी सर्व समाजाने सातत्याने एकत्रीत प्रयत्न करण्याची गरज आहे. प्रत्येकाने देवीचे व्रत म्हणून उपक्रमात खारीचा वाटा उचलावा, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश चिटणीस डॉ. विनय नातू यांनी केले.

गुहागर -  सरकार कोणाचेही असले तरी ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ या उपक्रमांसाठी पुरे पडू शकत नाही. त्यासाठी सर्व समाजाने सातत्याने एकत्रीत प्रयत्न करण्याची गरज आहे. प्रत्येकाने देवीचे व्रत म्हणून उपक्रमात खारीचा वाटा उचलावा, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश चिटणीस डॉ. विनय नातू यांनी केले.

नवरात्रोत्सवात दुर्गादेवी देवस्थानने ३० मुलींना शिक्षणासाठी ७१ हजार रुपयांचे अर्थसाह्य केले आहे. तीन वर्षांपूर्वी वरचापाट येथील दुर्गादेवी देवस्थानने मुलींच्या शिक्षणासाठी योगदान देण्याचा संकल्प सोडला. पहिल्या वर्षी नवरात्रात ५ मुलींना शैक्षणिक साहित्य भेट म्हणून देऊन या उपक्रमाला सुरवात केली. आता ही संख्या वाढली आहे. केवळ गुहागर गावापुरता मर्यादित असलेल्या या उपक्रमाची व्याप्ती तालुक्‍यापर्यंत पोचली आहे.

यावर्षीच्या नवरात्र उत्सवात तालुक्‍यातील १०, चिपळूण तालुक्‍यातील २ आणि दापोली तालुक्‍यातील १ अशा १३ गावांतील ३० मुलींना अर्थसाह्य करण्यात आले. यामध्ये पाचवीपासून ते एलएलबीच्या पहिल्या वर्षाला शिकणाऱ्या मुलींचा समावेश आहे. सर्व मुलींना सन्मानपूर्वक धनादेश देतानाच मुलींच्या मातांनाही देवीचे महावस्त्र देऊन गौरविण्यात आले. 

डॉ. विनय नातू म्हणाले की, ‘‘भाजपचे कार्यकर्ते असलेले राजेंद्र फडके यांनी मुलींचा जन्मदर, आरोग्य आणि शिक्षण या समस्यांना खऱ्या अर्थाने व्यापक स्वरुप दिले. पक्ष विचारांपलीकडे जाऊन समाजातील गंभीर समस्येचे निरसन करण्यासाठी ते केंद्र शासनासह विविध राज्यातील सरकारे, प्रशासकीय अधिकारी,  देशभरातील संस्था, प्रतिष्ठीत उद्योगसमूहांना ते भेटले. त्यातूनच बेटी बचाव, बेटी पढाव या अभियानाची निर्मिती झाली.’’ देवीच्या दर्शनासाठी गुहागरला आलेल्या राजेंद्र फडकेंनी देवस्थानला याबाबत काम करण्यास सांगितले. दुर्गादेवी देवस्थानने ५ मुलींपासून सुरवात केली आता ३० मुलींना ते मदत करत आहेत. या वेळी दुर्गादेवी देवस्थानचे अध्यक्ष किरण खरे, उपाध्यक्ष गणेश भिडे उपस्थित होते.

 

Web Title: ratnagiri news helps to girl by Durgadevi Devasthan