भोजन अनुदान, पगारासाठी देवरुख तहसीलसमोर उद्या वसतीगृह कर्मचाऱ्यांचे आंदोलन

प्रमोद हर्डीकर
गुरुवार, 25 जानेवारी 2018

साडवली - जिल्ह्यात मंजुर अनुदानीत ३५ वसतीगृहे आहेत. पैकी ३२ सुरु आहेत. पण यातील २६ वसतीगृहांना गेल्या दोन वर्षामध्ये भोजन अनुदान मिळालेले नाही. कर्मचारी वर्गाला एक वर्षाचा पगार मिळालेला नाही, गेल्या ३८ वर्षात असा कधीच प्रकार घडला नव्हता. यामुळे या सरकारचा निषेध करण्यासाठी २६ जानेवारी रोजी देवरूख तहसील कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहोत, असे निवेदन नयन मुळ्ये, सदानंद जुवेकर यांनी तहसीलदारांना दिले.

संगमेश्वर तालुक्यातील कोळंबे वसतीगृहाला दोन वर्ष झाली. तेथेही भोजन अनुदान मिळालेले नाही. एक वर्षाचा कर्मचारी पगार मिळालेला नाही, अशी स्थिती आहे. लोकप्रतिनीधी, जिल्हा परिषद प्रशासनाला याबाबत वेळोवेळी सांगितलेले आहे, तरीही याबाबत कोणी दखल घेतली नसल्याने  उद्या (ता. २६)  कोळंबे परीसर विद्या प्रसारक मंडळ, कोंळबे वसतीगृहातील संचालक, कर्मचारी, विद्यार्थी एकदिवसाचे लाक्षणीक उपोषण करणार आहेत 

शासनाने आजपर्यंत तारीख पे तारीख, आज नाही उद्या असे करत मुलांच्या जीवनाशी खेळ चालवला आहे. आजपर्यंत या विषयाची दोन वेळा सुनावणी होवून कागदपत्रांची पडताळणी झाली आहे. वेगवेगळी कारणे पुढे करुन अनुदानीत वसतीगृहे बंद करण्याचा शासन जोरदार प्रयत्न करत आहे. मुलांना शिक्षणापासुन वंचित ठेवण्याचे धोरण हे शासन अवलंबीत आहे

-  नयन मुळ्ये

Web Title: Ratnagiri News hostel workers agitation for salary