बाणकोट येथील घरांना सुरुंग स्फोटामुळे तडे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 मे 2018

मंडणगड - बाणकोट ते बागमांडला दरम्यान सागरी महामार्गावर सुरू असलेल्या पुलाच्या पिलरच्या कामासाठी बाणकोट व हिंमतगड किल्याचे परिसरात दगडासांठी करण्यात येणाऱ्या सुरुंग स्फोटांमुळे परिसरातील घरांना तडे जात आहेत. कूपनलिकांच्या पाणी पातळीवर परिणाम झाला. नागरिकांनी या संदर्भात तक्रारही केली. 

गेल्या वर्षापासून  बाणकोट किल्ला येथे अनेक घरांना तडे गेले. बाणकोट किल्ला येथील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. पुलाच्या कामासाठी वेळासकडे जाणारा जुना रस्ता वाढवण्यात येत आहे. 

परिसरामधील काळ्या दगडाचा वापर करण्यात येतो. दगड फोडण्यासाठी सुरुंग लावल्याने बाणकोट किल्ला येथे अकबर नाडकर, मकसूद मुकादम, इब्राहिम मापकर, इजाज अनवारे, शमशोद्दीन मापकर, हमिदा मापकर, शकील मुकादम, समीर दिनवारे, अशरफ मापकर, सुलतान मापकर, जहीर मापकर, नजीर मापकर, अब्दुल्ला नाडकर, सलीम मुकादम, मदार मापकर, रफीक मापकर, फयाज अनवारे, जाविद मापकर, गयास मापकर, फरान मुकादम, मकबूल मापकर, मुझफ्फर मापकर व इलियास नाडकर यांच्या घराच्या भिंतीना तडे गेले आहेत. तक्रारीनंतर काही दिवस सुरुंग बंद झाले. 

पक्‍क्‍या आरसीसी इमारतींनाही सुरुंगाचा हादरा बसून भिंतींना तडे गेले आहेत. त्याचबरोबर अन्य एका आरसीसी इमारतीचे काम सुरू असून, त्या इमारतीलाही तडे गेले आहेत व अन्य काही घरांच्या छपरावरील पत्र्यांनाही तडे गेले आहेत.

Web Title: Ratnagiri News house damage incidence in Bankot

टॅग्स