टाकळ्याची उपयुक्तता पटवणार विद्यार्थी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

चिपळूण - न्यू इंग्लिश स्कूल सती - चिंचघरीमधील विद्यार्थ्यांनी दुर्लक्षित टाकळ्याची उपयुक्तता संशोधनातून सिद्ध केली. राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेसाठी या प्रकल्पाची निवड झाली आहे. टाकळा वनस्पतीची शेती किफायतशीर करता येते. टाकळ्याची भाजी आरोग्यदायी असून लोहासह विविध जीवनसत्त्वे त्यातून मिळतात. चहा-कॉफीला पर्याय म्हणून देखील टाकळ्याचा उपयोग होत असल्याचे विद्यार्थ्यांनी दाखवून दिले.

सती-चिंचघरी विद्यालयाच्या ऋषीकेश पाटील, साक्षी शितोळे, श्रेया कुंभार, संदेश पास्टे यांनी बहुगुणी टाकळा प्रकल्पाची निर्मिती केली. विज्ञान शिक्षक शिवाजी पाटील यांनी मार्गदर्शन केले. विद्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना मुख्याध्यापक फणसे व विज्ञान शिक्षक पाटील म्हणाले, आपल्याकडे टाकळा वनस्पती दुर्लक्षित राहिली. टाकळा खाणे योग्य आहे का, यावर विद्यार्थ्यांनी खरवते अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयासह दापोली कोकण कृषी विद्यापीठात संशोधन केले. यातून टाकळ्यात पोषक द्रव्ये असून त्याची शेतीही करता येत असल्याचे सिद्ध झाले.

कोकण व्यतिरिक्त इतर भागात टाकळ्याची भाजी खाल्ली जात नाही. तरवट व टायफळ या नावानेही इतर विभागात त्याला संबोधले जाते. परदेशात टाकळ्यांच्या बियांचा वापर केला जातो. त्यास प्रती किलो ५०० ते एक हजाराचा दर मिळतो. टाकळ्याचे तेल संधिवातासाठी उपयुक्त आहे. ही वनस्पती प्रत्येक अवस्थेत आरोग्यासाठी वापरली जाते. यामध्ये जीवनसत्त्वे अधिक असून त्वचा विकारासाठी उपयोगी आहे. हिरवळीचे खत म्हणून वापर केला तर जमिनीची प्रत सुधारण्यास मदत होते. यामध्ये विरेचक असल्याने चहा कॉफीला देखील तो पर्याय ठरू शकतो. ही वनस्पती बारमाही येत असून ती दुष्काळी भागात देखील वरदान ठरू शकते. शेतीस नवसंजीवनी देणारी ही वनस्पती असल्याने कोकणात टाकळा शेतीबाबत जागृती करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

४० प्रकल्पांवर संशोधन
विद्यालयाने ४ वेळा राष्ट्रीय स्तरावर १४ वेळा राज्यस्तरावर ३६ वेळा जिल्हास्तरावर बाजी मारली आहे. तसेच येथील विद्यार्थ्यांनी ४० प्रकल्पावर संशोधन केल्याचे सांगितले. अहमदाबाद (गुजरात) येथे २७ ते ३१ डिसेंबर दरम्यान राष्ट्रीय बालविज्ञान परिषद होत आहे. यामध्ये विद्यालयाचा ऋषीकेश पाटील या प्रकल्पाचे सादरीकरण करणार आहे. 

Web Title: Ratnagiri News importance of Takala