वडखळ नाका येथे अपघातात इसवलीचे माजी सरपंच ठार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 मार्च 2018

लांजा - तालुक्‍यातील इसवली गावचे माजी सरपंच, सद्या मुंबई महानगर पालिकेच्या सेवेत असणारे रवींद्र शिवराम कांबळे (रा. इसवली, ता. लांजा) यांचा आज सकाळी पेण-वडखळ नाका येथे अपघातात मृत्यू झाला. तर त्यांच्या सोबत असणारे रूपेश कांबळे गंभीर जखमी झाले आहेत.

महाड येथील चवदार तळे सत्याग्रह, क्रांतिदिनी अभिवादन करण्यासाठी मुंबईहून दुचाकीने महाडकडे जात असतानाच अवजड वाहनाने धडक दिल्याने अपघात घडला. यामध्ये रवींद्र यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असणारे रूपेश कांबळे (रा. इसवली) गंभीर जखमी झाले. त्यांना पेण येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी  हलविण्यात आले आहे. लांजा तालुक्‍याच्या समाज चळवळीत सक्रिय असणारे रवींद्र कांबळे यांच्या निधनाची वार्ता समजतात मुंबई व लांजा तालुक्‍याच्या ग्रामीण भागात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या मागे पत्‍नी, दोन मुले असा परिवार आहे.

Web Title: Ratnagiri News Isavali Ex-Sampanch dead in an accident