खेडशी-गयाळवाडीचे विद्यार्थी घरीच

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जानेवारी 2018

रत्नागिरी - दहापेक्षा अधिक पट असतानाही तालुक्‍यातील खेडशी-गयाळवाडी आदर्श शाळेला कुलूप ठोकून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना एक किलोमीटर अंतरावरील कॉलनीजवळील शाळेत समायोजित करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला पालकांनी विरोध दर्शवत नवीन शाळेत मुलांना न पाठविण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे सलग दोन दिवस विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले आहेत. 

रत्नागिरी - दहापेक्षा अधिक पट असतानाही तालुक्‍यातील खेडशी-गयाळवाडी आदर्श शाळेला कुलूप ठोकून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना एक किलोमीटर अंतरावरील कॉलनीजवळील शाळेत समायोजित करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला पालकांनी विरोध दर्शवत नवीन शाळेत मुलांना न पाठविण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे सलग दोन दिवस विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले आहेत. 

याबाबत पंचायत समितीचा शिक्षण विभागही अनभिज्ञ असल्याची माहिती पुढे आली आहे. आदर्श मराठी शाळा गयाळवाडीत सुरवातीला नऊ विद्यार्थी होते. 

शाळा बंद न करण्याचा निर्णय...
दरम्यान, सायंकाळी शाळा व्यवस्थापन समितीने ‘दहापेक्षा अधिक पट असल्याने आमची शाळा बंद करू नये’ असे पत्र शिक्षण विभागाला दिले. शिक्षण विभागानेही याची दखल घेत ही शाळा बंद न करण्याचा निर्णय घेतला. सायंकाळी उशिरा हा निर्णय झाला. त्यानंतर तत्काळ शाळेचे कुलूप उघडण्यात आले. उद्या (ता. २४)पासून शाळेचे कामकाज नियमित सुरू राहणार आहे.

यावर्षी त्यात तीन नवीन विद्यार्थ्यांची भर पडली. कमी पटाच्या शाळांमधील विद्यार्थी एक किमी परिसरातील शाळेत पाठवा असा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सुमारे १८८ शाळांची यादी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडे पाठविली आहे. शिक्षण विभागानेही २० जानेवारीपर्यंत या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गयाळवाडी येथील बारा विद्यार्थ्यांचे एक किमी अंतरावर असलेल्या कॉलनीतील शाळेत समायोजन करण्यात येत आहे. कालपासून शिक्षकांनी शाळेला कुलूप लावून विद्यार्थ्यांना त्या शाळेत पाठविण्याच्या सूचना पालकांना दिल्या आहेत. 

शैक्षणिक वर्ष सुरू असताना समायोजन प्रक्रियेची अंमलबजावणी करणे योग्य नाही. त्याचा मुलांच्या अभ्यासावर परिणाम होईल. तसेच, पालकांचीही तारांबळ उडणार आहे. मेमध्ये पुन्हा सर्वेक्षण करून समायोजन 
केले पाहिजे.
- महेश म्हाप,
सदस्य, जिल्हा परिषद

दहापेक्षा अधिक पट असेल तर तेथील शालेय व्यवस्थापन समितीबरोबर केंद्रप्रमुखांनी चर्चा करून विद्यार्थ्यांचे समायोजन करावे. तोपर्यंत शाळा बंद करू नये, अशा सूचना दिल्या आहेत. त्यानुसार गयाळवाडी शाळा सुरू होईल. तशा सूचना संबंधित शिक्षकांना दिल्या आहेत.
- सुनील पाटील,
गटशिक्षणाधिकारी

गयाळवाडीतील ग्रामस्थांनी ही मराठी शाळा बंद न करण्याचा निर्णय घेतला असून आपल्या पाल्याला शाळेतच न पाठविण्याचा निर्णय घेतला. कॉलनी ते गयाळवाडी हे अंतर एक किमीपेक्षा अधिक असून लहान मुलांना तिकडे कसे पाठवायचे असा प्रश्‍न ग्रामस्थ श्री. गावडे यांनी उपस्थित केला आहे.
सलग दोन दिवस गयाळवाडीतील ती बारा मुले शिक्षणापासून वंचित राहिली आहेत. याबाबत पंचायत समिती शिक्षण विभागही अनभिज्ञ होता. शाळेला कुलूप ठोकल्यानंतर याबाबत ग्रामस्थांनी शिक्षण सभापती दीपक नागले यांच्याशी चर्चा केली. त्यांनीही शाळा पुन्हा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल असे सांगितले. शाळेला कुलूप ठोकल्याची माहिती

गटशिक्षणाधिकारी श्री. पाटील यांना सांगितल्यानंतर त्यांनी तत्काळ याची चौकशी सुरू केली आहे. दहापेक्षा अधिक पट असलेल्या शाळा बंद करण्यापूर्वी तेथील शाळा व्यवस्थापन समितीशी चर्चा करणे बंधनकारक आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतरच त्या शाळेतील विद्यार्थ्यांना अन्य ठिकाणी समायोजित करा अशा सूचना दिल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले. शिक्षण विभागाच्या आदेशानंतर कारवाईच्या भीतीने शाळेला कुलूप ठोकून शिक्षकांनीही तत्काळ अंमलबजावणी केली; मात्र त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना दोन दिवस शिक्षणपासून वंचित राहावे लागले. याबाबत ग्रामस्थ श्री. गावडे यांनी शिक्षण विभागाच्या गलथान कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्‍त केली.

Web Title: Ratnagiri News issue of school in Khedshi-Gayalwadi