‘जगबुडी, नारंगी’ने खेडला धोका

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जुलै 2018

खेड - जगबुडी व नारंगी या नद्यांचे मोठे पाणलोट क्षेत्र आणि सह्याद्री पट्ट्यातील घाटमाथ्यावरील चांगला पाऊस यामुळे खेड शहर व परिसर पुराच्या छायेखाली आहे. येथील भौगोलिक रचनेमुळे हे कायमचे दुखणे आहे. जगबुडी व नारंगी या दोन्ही नद्यांचा संगम खेड शहरानजीक असलेल्या देवणेबंदर परिसरात होतो. त्यामुळे येथे सर्वात आधी पाणी भरते.

तालुक्‍यात जगबुडीचे पाणलोट क्षेत्र मोठे आहे. सह्याद्री पट्ट्यातील आंबवली घाटात वडगाव बुद्रुक येथे जगबुडीचे उगमस्थान. तेथून ४० किलोमीटरचे नदीचे क्षेत्र आहे. सह्याद्री पट्ट्यातून येताना तिला अनेक उपनद्या, नाले, ओढे मिळतात. जगबुडी नदीची पाच मीटर पाणी पातळी अलर्ट लेव्हल आहे. डेंजर लेव्हल ही सात मीटरची. गेल्या चार दिवसांमध्ये मुसळधार पावसाने जगबुडीची पातळी सहा मीटरवरून साडेसात मीटरपर्यंत गेली. प्रवाहाला करंट होता.

त्यामुळे महामार्गावरील ब्रिटिशकालीन पुलाला धोका पोचण्याची शक्‍यता होती. त्यामुळे या पुलावरील वाहतूक दोन वेळा बंद करावी लागली होती. नारंगीचा उगम हा पोयनार धामणी घाटात होतो. या नदीचे पाणलोट क्षेत्र २८ किलोमीटरचे आहे. शिवतरहून येणारी एक उपनदी तिला मिळते. पुढे या नदीला अनेक छोटे ओढे, नाले मिळाल्याने या नदीचे पात्र विस्तीर्ण होते. त्यामुळे चिंचघर, सुसेरी या सखल भागांतील गावांना मोठा फटका बसतो. या गावात जाणारे रस्ते बंद होतात. या नदीपात्रालगतची भातशेती पाण्याखाली जाते.

दृष्टिक्षेपात ः 
जगबुडी नदीचे पाणलोट क्षेत्र सुमारे ३७२ चौ.कि.मी, तर नारंगी नदीचे पाणलोट क्षेत्र सुमारे १८५ चौ.कि.मी आहे.

Web Title: Ratnagiri News Jagbudi, Narangi Danger zone special