मद्यासाठी वापण्यात येणारा लाखो रुपयांचा गुळ जप्त 

अमोल कलये
सोमवार, 19 मार्च 2018

रत्नागिरी -  मद्य तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा गुळ राज्य उत्पादन शुल्कच्या रत्नागिरी विभागाने जप्त केला. तालुक्यातील मिरजोळे पाटीलवाडी - करबुडे रोडवरील  गणेश विसर्जन घाटाजवळ ही कारवाई करण्यात आली.

रत्नागिरी -  मद्य तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा गुळ राज्य उत्पादन शुल्कच्या रत्नागिरी विभागाने जप्त केला. तालुक्यातील मिरजोळे पाटीलवाडी - करबुडे रोडवरील  गणेश विसर्जन घाटाजवळ ही कारवाई करण्यात आली.

या कारवाईमध्ये जवळपास दोन लाख 80 हजार रुपयांचा गुळ जप्त करण्यात आला तर 14 लाख 65 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की या गुळाची ट्रकमधून वाहतूक करण्यात येत होती. दहा किलोच्या 680  तर पाच किलोच्या 36 गुळाच्या ढेपा या गाडीत होत्या..जवळपास 6980 किलोचा हा गुळ होता. ज्याची किंमत अंदाजे दोन लाख 80 हजार रुपये इतकी आहे.  या व्यतिरिक्त मद्य तयार करण्यासाठी लागणारे रसायन देखील जप्त करण्यात आले आहे. ज्या ट्रकमधून ही वाहतूक करण्यात येत होती या ट्रकसह सुमारे 14 लाख 65 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी मिलींद चव्हाण, जयदिप पाटील आणि शामराव जाधव  या तिघांना अटक करण्यात आले आहे. 

Web Title: Ratnagiri News Jaggary used in the liquor preparation seized

टॅग्स