जैतापूर किनारा सजला पर्यटकांच्या स्वागतासाठी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 मार्च 2018

रत्नागिरी - पर्यटन वाढीबरोबरच रोजगार निर्मितीसाठी निर्मल सागर तट अभियान रत्नागिरी जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. किनाऱ्यावर पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध करून पर्यटकांना आकर्षित करण्याचा फंडा अवलंबला जात आहे. स्वच्छ आणि सुंदर किनारी भागासाठी स्पर्धा आयोजित केली असून त्याचे सर्वेक्षण जोरात सुरू आहे. जैतापूर (राजापूर) किनारा अशा सुविधांमुळे सजला आहे.

निर्मल सागर तट अभियानांतर्गत जिल्ह्यातील महत्त्वाचे किनारे विकसित केले जाणार आहेत. त्यासाठी ग्रामस्तरावर समिती स्थापन केली आहे. ती समिती ग्रामस्थांच्या मदतीने किनारा स्वच्छ करण्यापासून तेथे नियंत्रण ठेवण्याचे काम करते. पर्यटकांना सुविधा देण्यासाठी मेरीटाईम बोर्डाकडून लोकसंख्येनुसार निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याचा आराखडा समितीकडून तयार करून घेण्यात आला आहे.

पर्यटकांना समुद्राकडे जाण्यासाठी मार्गाची माहिती व्हावी यासाठी रस्त्यावर ठिकठिकाणी फलक लावले आहेत. किनाऱ्यावर पर्यटकांना बसण्याची लाकडी बेंचीस, पोहणाऱ्यांना कपडे बदलण्यासाठी खोली, स्वच्छतागृह, लहान मुलांसाठी बागबगीचा, स्वच्छता राखण्यासाठी कचराकुंड्याही ठेवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये साचलेला कचरा नियमित साफ करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीवर सोपविण्यात आली आहे. सागर तट व्यवस्थापनांतर्गत आयोजित स्पर्धेत पारितोषिक मिळविण्यासाठी जैतापूर ग्रामस्तरीय समितीने जोरदार तयारी केली आहे.

जैतापूर ग्रामस्तरीय समितीने चांगल्याप्रकारे नियोजन केले आहे. पर्यटकांना आवश्‍यक सुविधाही दिल्या आहेत. तेथील ग्रामस्थ अभिनंदनास पात्र आहेत.
- कॅ. संजय उगलमुगले,
प्रादेशिक बंदर अधिकारीप्रादेशिक बंदर अधिकारी

Web Title: Ratnagiri News Jaitapur sea beach beautification