केरीळ गावाने स्वीकारले दीक्षाचे पालकत्व 

सचिन माळी
सोमवार, 25 जून 2018

मंडणगड - घरातील बिकट परिस्थितीवर मात करून दहावीच्या परीक्षेत 92 टक्के गुण घेणार्‍या दीक्षा पवार हिचे पालकत्व केरीळ ग्रामविकास मंडळ व पद्मावतीदेवी क्रिकेट संघ यांनी स्वीकारले. दीक्षाचा अकरावी, बारावीच्या शिक्षणाचा सर्व खर्च केरीळ गावाच्यावतीने करण्यात येणार आहे.

मंडणगड - घरातील बिकट परिस्थितीवर मात करून दहावीच्या परीक्षेत 92 टक्के गुण घेणार्‍या दीक्षा पवार हिचे पालकत्व केरीळ ग्रामविकास मंडळ व पद्मावतीदेवी क्रिकेट संघ यांनी स्वीकारले. दीक्षाचा अकरावी, बारावीच्या शिक्षणाचा सर्व खर्च केरीळ गावाच्यावतीने करण्यात येणार आहे.

रविवारी (ता. 24) मंडळाच्या वतीने दहा हजारांचा धनादेश व अनेक दानशूर व्यक्तींनी मदत केलेली रोख रक्कम रुपये 6 हजार दीक्षाकडे सुपूर्द करण्यात आली. यामुळे पवार कुटुंब भारावून गेले.

दहावीच्या परीक्षेत 92 टक्के गुण मिळवले. तिची शैक्षणिक आवड आणि कष्ट करून यश मिळविण्याची धडपड पाहून समाजातून आर्थिक स्वरूपात पाठिंबा आणि प्रोत्साहन मिळाले. केरीळ ग्रामविकास मंडळाने पुढाकार घेतला.महाविद्यालय, विविध कोर्सेस, स्पर्धा परीक्षांसाठी लागणारा खर्च मंडळ आणि पद्मावतीदेवी क्रिकेट संघ करणार आहे. तशी घोषणा सेक्रेटरी सचिन कुळे यांनी केली.

गावातील आयटीआय करणार्‍या प्रितेश कंचावडे यालाही मंडळाच्या वतीने 5 हजारांचा धनादेश देण्यात आला. या वेळी सचिन कुळे, शिवराम बांडल, शंकर कुळे, महादेव निंगावले, राजाराम बैकर, रघुनाथ पोस्टुरे, विजय ऐनेकर, संजय बोथरे, दक्षना पवार, सुशील बांडल उपस्थित होते.

अनेक हात मदतीसाठी पुढे

अनेक हात दीक्षाच्या मदतीसाठी पुढे आले. श्रीसाई श्रद्धा सेवा मंडळ कुडुक बुद्रुक 5 हजार, पवार भावकी 4 हजार, कुणबी सेवा संघ मंडणगडचे अध्यक्ष दिनेश साखरे 1 हजार, समाजसेवक विकास रटाटे (आंबवली) 1 हजार व निवृत्त डीवायएसपी विलास लक्ष्मण भोसले (पुणे) यांनी अडीच हजार रुपये दीक्षाच्या खात्यात जमा केले. ती ग्रॅज्युएट होईपर्यंत ते शैक्षणिक मदत करणार आहेत.

Web Title: Ratnagiri News Keril village adopt Diksha