मिऱ्याच्या संरक्षणासाठी मूळ बंधाऱ्याला बळकटी 

राजेश शेळके
गुरुवार, 29 जून 2017

रत्नागिरी - मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याला बळकटी आणण्यासाठी भाटीमिऱ्या ते जयहिंद चौक असा सुमारे 258 मीटरचा सुधारित धूपप्रतिबंधक बंधारा उभारण्यात येणार आहे. सुमारे 50 लाखांचे काम आहे. उधाणाच्या लाटांचा विचार करून बंधाऱ्याची उंची आणखी अडीच फूट वाढविण्यात येईल. त्यामुळे तेथील रहिवाशांना दिलासा मिळणार आहे. वाहून गेलेल्या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी पतनकडे निधी नाही. त्यामुळे या पावसात तेथे धोका कायम आहे. 

मिऱ्यातील सुमारे 1100 मीटरच्या भागाला बंधाऱ्याचे संरक्षण आहे; परंतु मिरकरवाडा टप्पा 1 आणि 2 चे काम सुरू झाले आणि बंदरातील गाळ रोखण्यासाठी समुद्रात काही मीटरची वॉटरवॉल उभारण्यात आली. त्यामुळे बंदरातील गाळ येण्याचे प्रमाण कमी झाले, पण थांबले नाही. दुसऱ्या टप्प्यात "टी' आकाराचा बंधारा बांधण्यात आला. मिरकरवाड्यातील या सुधारणांमुळे समुद्राच्या पाण्याचा प्रवाह बदलल्याचा आरोप तेथील रहिवाशांनी केला. प्रवाह बदलल्याने उधाणाच्या पाण्याचा प्रचंड दाब मिऱ्या बंधाऱ्यावर थेट पडतो. या भागात आता उधाणावेळी मोठ्या लाटा बंधाऱ्यावर येऊन आपटतात. त्यामुळे दरवर्षी त्याची धूप होते. 

दोन वर्षांपूर्वी बंधाऱ्याचे काम करण्यात आले. साधारण तीन ते चार मीटर खोदाई करून दगडाचे पिचिंग केले. बंधाऱ्यात मोठ-मोठे दगड वापरले. यावर्षी पावसात सुरवातीलाच तो तीन ठिकाणी वाहून गेला. बंधाऱ्याची धूप झाल्याने उधाणाचे पाणी घरांपर्यंत येऊ लागले. उधाण वाढले तर काय या भीतीने येथील लोक जीव मुठीत धरून असतात. पतन विभागाने बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी सुमारे 47 लाख 51 हजारांचा प्रस्ताव सादर केला. वारंवार पाठपुरावा केल्याने तो मंजूर झाला; पण हे काम पावसानंतर होणार आहे. 

Web Title: ratnagiri news konakn

टॅग्स