दापोली विद्यापीठ बस अपघातग्रस्त कुटुंबीयांसाठी मदतीचा ओघ

चंद्रशेखर जोशी
मंगळवार, 31 जुलै 2018

दाभोळ - महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात 28 जुलैला  सहलीला गेलेल्या विद्यापीठाच्या कर्मचार्‍यांची बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात 30 कर्मचारी मृत्युमुखी पडले. या कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यासाठी विद्यापीठाचे कर्मचारी सरसावले. विद्यापीठातील प्राध्यापक संघटनेतील सदस्यांनी आपला एक दिवसाचा पगार या कर्मचार्‍यांना देण्याची घोषणा केली आहे. तर इतर कर्मचारीही आपला एक दिवसाचा पगार देणार आहेत.

या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून चार लाख रुपयांची मदत करण्यात आली असून पालकमंत्री रवींद्र वायकर यांनीही प्रत्येकी दहा हजार रुपयांची मदत दिली आहे.

काल (ता. 30) रोजी प्राध्यापक संघटनेच्या झालेल्या बैठकीत विद्यापीठातील सर्व प्राध्यापकांनी आपले एक दिवसाचे वेतन कुटुंबीयांना देण्याचे ठरल्याची माहिती या संघटनेचे अध्यक्ष डॉ. विठ्ठल नाईक यांनी दिली. विद्यापीठाचे इतर कर्मचारीही एक दिवसाचे वेतन देणार आहेत. यामुळे सुमारे 30 ते 32 लाख रुपये जमा होतील. मृत्यूमुखी पडलेल्या कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी भारतीय स्टेट बँकेत विद्यापीठाच्या वतीने एक खातेही काल (ता.30) काढण्यात आले.

खात्यात पैसे जमा करावेत 

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अनेक माजी विद्यार्थ्यांनीही मदत करण्याची इच्छा विद्यापीठाकडे व्यक्त केली असून त्यांनी आता विद्यापीठाच्यावतीने उघडण्यात आलेल्या खात्यात पैसे जमा करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. हे खाते स्टेट बँक ऑफ इंडियाच्या दापोली शाखेत उघडण्यात आले असून त्याचा खाते क्रमांक 37843077629 असा आहे.

Web Title: Ratnagiri News Konkan Agriculture University Bus accident