सवंगडी, वर्गमित्र सारे हिरावले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 जुलै 2018

खेड - माझे वर्गमित्र मी गमावले त्याचे खूप मोठे दुःख आहे. आज त्यांच्या कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. हे दुःख पचविण्यासाठी परमेश्‍वर त्यांच्या कुटुंबीयांना बळ देवो, अशी भावूक प्रतिक्रिया दीपक देवघरकर यांनी दिली. बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले. 

दापोली कोकण कृषी विद्यापीठात कार्यालय नियंत्रक पदावर काम करणारा जालगाव येथील सुनील साठले हा माझा वर्गमित्र. आम्ही बालपणापासून एकत्र शाळेत एकाच वर्गात एकाच बेंचवर बसायचो. त्याचा एक दिवसाआड मला फोन असायचाच किंवा मी तरी त्याला फोन करीत असे. पण काल अचानकच त्याने या सहलीच्या निमित्ताने माझी साथ सोडली.

वणंद येथे राहणारा माझा मित्र सचिन गुजर हा विद्यापीठात बांधकाम विभागात होता. त्याचे माझे खूप जवळचे संबंध होते. पण मी नोकरीनिमित्त खेडला राहत असल्यामुळे महिन्याभरात एखादी भेट होत असे. पण नियतीच्या मनात मात्र ही भेटदेखील चुकवायची होती. त्यामुळे सचिन आम्हाला सोडून गेला.

गिम्हवणे झगडेवाडीतील संदीप, सचिन, संजीव व संतोष हे एकाच कुटुंबातील चार भाऊ एकावेळी अपघाती मृत्यूू पावले. त्यामुळे त्यांच्या घरात काय काहूर माजले असेल याची कल्पनाच करवत नाही. 

घरात एकटाच कमवता..
संतोषच्या घरी तो एकटाच कमावता होता. त्यामुळे पुढे काय, कसे, याची कल्पनाच करवत नाही असेही देवघरकर यांनी सांगितले.

Web Title: Ratnagiri News Konkan Agriculture University Bus accident special