माहूतील जाधव कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 जुलै 2018

मंडणगड - आंबेनळी घाटात शनिवारी (ता. २८) झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मंडणगड तालुक्‍यातील माहू येथील प्रमोद रमेश जाधव (वय ३५) यांच्यावर आज त्यांच्या माहू या मूळ गावी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार झाले. तरुण मुलाच्या अकाली मृत्यूने आई, वडील, भाऊ यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला.

२०१३ ला विद्यापीठात परीक्षा विभागात क्‍लार्क म्हणून सेवेत रुजू झाले होते. अपघाताची बातमी समजताच तालुक्‍यातील आरपीआयचे दादा मर्चंडे, आदेश मर्चंडे, राजेश गमरे यांच्यासह अन्य पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते घटनास्थळी पोचले. रात्री साडेसात वाजता मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात मिळाल्यावर रात्री ९ वाजता माहू येथे आणण्यात आला. आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास माहू येथील दफनभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले.

चुकीच्या माहितीमुळे गोंधळ
मंडणगड शहरातील मूळ दुर्गवाडी येथील व सध्या दापोलीत राहणारे रविकिरण साळवी देखील जाणार होते. मात्र आईने मनाई केल्याने त्यांचे प्राण वाचले. त्यांच्या चार महिन्यांच्या मुलाची प्रकृती बरी नसल्याने आईने मुलाला बरे नसताना तू सहलीला जाऊ नकोस, असे सांगितले. रविकिरणने आईचे ऐकल्यामुळे त्यांचे प्राण वाचले. अपघाताच्या बातमीत रविकिरण मृत झाले असल्याची माहिती पसरल्याने अनेक मित्र नातेवाइकांनी फोनवर चौकशी केल्याने कुटुंबाला मानसिक त्रास सहन करावा लागला.

Web Title: Ratnagiri News Konkan Agriculture University Bus accident special