ध्रुवीकरण रोखण्‍यासाठी मतदार ट्रिपवर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 मे 2018

रत्नागिरी - विधान परिषदेच्या कोकण मतदारसंघातून सुनील तटकरेंचा मुलगा रिंगणात असल्याने शिवसेनेची दमछाक सुरू झाली आहे. प्रत्येक मताला ‘अर्थ’पूर्ण महत्त्व असल्याने फोडाफोडीचे राजकारण रंगू लागले आहे. मतांच्या ध्रुवीकरणाची शक्‍यता लक्षात घेऊन मतदारांच्या ‘ट्रिप’चे नियोजन सुरू झाले आहे; मात्र अधिकचा भार टाळण्यासाठी दूरच्या ठिकाणांऐवजी जवळच्या फार्म हाऊसची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. ही जबाबदारी त्या-त्या आमदारांवर सोपविण्यात आल्याचे समजते.

कोकणात राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी लढत निश्‍चित झाली आहे. राष्ट्रवादीला शेकाप, स्वाभिमान, मनसेचे पाठबळ मिळाले आहे. शिवसेना-भाजप युती असली तरीही विधान परिषदेसाठीचे मनोमिलन अजूनही अधांतरीच आहे. पालघरच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने उमेदवार रिंगणात उतरविल्यामुळे भाजपची भूमिका काय राहणार, यावर गणिते अवलंबून राहणार आहेत.

राष्ट्रवादीकडून पाचशे मतांचे गणित बांधण्यासाठी नियोजन सुरू आहे. सुनील तटकरे यांचे जिल्ह्यातील नेत्यांशी निकटचे संबंध आहेत. त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो. ही शक्‍यता लक्षात घेऊन शिवसेनाही सतर्क झाली आहे. खासदार विनायक राऊत तळ ठोकून रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वारंवार दौरे करीत आहेत. स्थानिक आमदारांसह जिल्हा परिषद, नगरपालिका पदाधिकाऱ्यांच्या बैठकांवर भर देत आहेत.

शिवसेनेकडून रिंगणात असलेल्या राजीव साबळे यांच्यासाठी तटकरेंचे आव्हान निश्‍चितचे तगडे आहे. राणेंच्या स्वाभिमानची एक गठ्ठा मते पारड्यात पडली तर मोठा फरक पडणार आहे. जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात सुमारे सव्वादोनशे मते आहेत. बहुतांशी मते शिवसेनेचीच आहेत. त्यांना एकगठ्ठा ठेवण्यासाठी आणि विरोधी नेत्यांच्या हितसंबंधातून मते फुटू नयेत, यासाठी काळजी घेतली जात आहे. 

सर्वांचे लक्ष
मे महिन्याच्या तोंडावर मतदारांच्या सहली कुठे जाणार याकडेच सर्वांचे लक्ष आहे. अखेरच्या पाच ते सहा दिवसांत या घडामोडी घडणार असल्याने त्याच वेळी सर्वजण ट्रिपला जातील अशी चर्चा सुरू आहे.

Web Title: Ratnagiri News Konkan assembly Election