रायगड, पालघरमध्ये सर्वाधिक 469 मते

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

रत्नागिरी - कोकण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी दुरंगी लढत होणार आहे. त्यासाठी ९४१ मतदार मतदानाचा हक्‍क बजावणार आहेत. त्यात ४६९ पुरुष आणि ४७२ महिला मतदार आहेत. रायगड, पालघर या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक ४६९ मते आहेत. या भागात राष्ट्रवादी, शेकापचे प्राबल्य आहे.

नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती यामध्ये मतदान करतात. पनवेलपासून ते सिंधुदुर्गमधील सावंतवाडीपर्यंत हा मतदारसंघ आहे. यामध्ये १६ विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. पनवेल, कर्जतमध्ये अनुक्रमे ११८ व १०४ मतदार असून पेणमध्ये ३० मते आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात पाच विधानसभा मतदारसंघांत २५९, सिंधुदुुर्गतील तीन मतदारसंघांत २२२ आणि रायगडमध्ये २१७ मतदार आहेत. मतदारांची आकडेवारी प्रशासनाकडून जाहीर केली आहे. त्यानुसार मतदान केंद्रे निश्‍चित केली जातील. ७ मेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. २१ मे रोजी मतदान असून दुसऱ्या दिवशी निकाल जाहीर होणार आहे.

मतदारसंघ    पुरुष    महिला    एकूण
पनवेल    ६२    ५६    ११८
कर्जत    ५१    ५३    १०४
पेण    १४    १६    ३०
अलिबाग    २२    २९    ५१
रोहा    १५    १३    २८
श्रीवर्धन    २१    २४    ४५
माणगाव    २२    २४    ४६
महाड    २४    २३    ४७
दापोली    २६    २२    ४८
खेड    १५    १३    २८
चिपळूण    २८    ३५    ६३
रत्नागिरी    ३५    ३६    ७१
राजापूर    २४    २५    ४९
कणकवली    ३६    ४१    ७७
कुडाळ    ३३    २३    ५६
सावंतवाडी    ४१    ३८    ७९
 
Web Title: Ratnagiri News Konkan Election special