कोकण पदवीधर मतदारसंघः १६ हजार मतदारांना एसएमएस

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 जून 2018

रत्नागिरी - पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. निवडणूक आयोगाने मतदानाची वेळ बदलून सकाळी ७ ते सायंकाळी ५ अशी ठेवली आहे. एकूण २६ मतदान केंद्र असून मतदारांना केंद्रात मोबाईल बंदी आहे. मतदान प्रक्रियेचे व्हिडिओ शूटिंग होणार आहे. मतदानाचा हक्क बजावावा, जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी जिल्ह्यातील १६ हजार २२२ मतदारांना एसएमएस पाठविण्यात येतील, अशी माहिती जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी दिली. 

जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी निवासी जिल्हाधिकारी अभिजित घोरपडे, निवडणूक अधिकारी सुशांत बनसोडे उपस्थित होते. मतदानासाठी २६ मतदान केंद्रे आहेत. सर्वात कमी १३५ मतदार असलेले केंद्र माखजन, तर सर्वात जास्त ९३२ मतदार असलेले केंद्र लांजा आहे. निवडणुकीसाठी २३६ कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. मायक्रो ऑब्जरव्हर नेमले आहेत. गेल्यावेळी १२ हजार मतदार होते. यावर्षी त्यामध्ये चार हजाराने वाढ झाली आहे. मतदान केंद्रावर दक्षता घेण्यात आली आहे. २६ केंद्रावर २३६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. चोख पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. 

केंद्रामध्ये मोबाईल बंदी घातली आहे. त्यामुळे कोणीही केंद्रावर मोबाईल आणू नये. आणला तर तो केंद्राबाहेर जमा करून घेतला जाणार आहे. जास्तीत जास्त पदवीधरांनी मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

Web Title: Ratnagiri News Konkan Graduate constituency election