कोकण रेल्वेच्या मान्यताप्राप्त युनिअनवर ‘लाल बावटा’

राजेश कळंबटे
गुरुवार, 25 जानेवारी 2018

रत्नागिरी - राष्ट्रीय मजदूर युनिअन अर्थातच लाल बावटा संघटनेची पुन्हा एकदा कोकण रेल्वेची मान्यताप्राप्त युनिअन म्हणून निवड झाली आहे. मान्यता प्राप्त युनिअनसाठी काल निवडणूक घेण्यात आली होती. आज मतमोजणी झाली.

रत्नागिरी - राष्ट्रीय मजदूर युनिअन अर्थातच लाल बावटा संघटनेची पुन्हा एकदा कोकण रेल्वेची मान्यताप्राप्त युनिअन म्हणून निवड झाली आहे. मान्यता प्राप्त युनिअनसाठी काल निवडणूक घेण्यात आली होती. आज मतमोजणी झाली.

कोकण रेल्वे कामगार संघटनेचा (केआरसीएल) यामध्ये 430 मतांनी पराभव झाला. प्रतिष्ठा पणाला लावलेल्या रेल्वे कामगार सेनेचीही या निवडणूकीत निराशा झाली.

दरम्यान काल कोकण, गोवा आणि कर्नाटकमधील 22 केंद्रावर 97 टक्के मतदान झाले होते. कोकण रेल्वेच्या रत्नागिरीतील विभागीय कार्यालयात आज मतमोजणी झाली. एनआरएमयु विरुध्द केआरसीएल यांच्यात चुरस निर्माण झाल्यामुळे काही काळ वातावरण तंग होते. घोषणाबाजीवरुन शाब्दिक चकमकही उडाली. त्यानंतर बंदोबस्तही वाढविण्यात आला. विशेष पथक दाखल झाल्यानंतर उपस्थित संघटनेच्या कार्यकर्त्यानी शांततेचा पवित्रा घेतला. रेल्वे पोलिसांसह स्थानिक पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवला होता. शेवटपर्यंत मतमोजणीत गुप्तता पाळण्यात आली होती.

एकूण 4,839 मतदान झाले. त्यात रेल्वे सेनेला 679 मते, नॅशनल राष्ट्रीय मजदूर युनिअनला 2282, केआरसीएलला 1852 तर कोकण रेल्वे कामगार युनिअनला 61 मते मिळाली. लाल बावट्याने विजय मिळविल्यानंतर कार्यालयापुढे जल्लोष केला. याप्रसंगी उपस्थित राहीलेले लाल बावट्याचे नेते वेणू नायर यांनी कोकण रेल्वेचा समावेश सेंट्रल रेल्वेमध्ये करण्यावर भर देणार असल्याचे जाहीर केले.

Web Title: Ratnagiri News Konkan railway election National worker union wins