कोकणी शेतकरी वळतोय शेळीपालनाकडे

मकरंद पटवर्धन
सोमवार, 16 ऑक्टोबर 2017

रत्नागिरी - शेळीपालनाबाबत जिल्ह्यात शेतकऱ्यांमध्ये जागृती होत आहे. त्यामध्ये रोजगाराच्या भरपूर संधी आहेत. हे लक्षात आल्यामुळे जोडधंदा म्हणूनही शेतकरी त्याला पसंती देत आहेत. मुंबईतील नोकरी सोडून येथे परतून शेळीपालन करण्यास तरुण तयार झाले आहेत. हे लक्षात घेऊन बॅंक ऑफ इंडियाने त्यांच्यासाठी प्रशिक्षण सुरू केले.

रत्नागिरी - शेळीपालनाबाबत जिल्ह्यात शेतकऱ्यांमध्ये जागृती होत आहे. त्यामध्ये रोजगाराच्या भरपूर संधी आहेत. हे लक्षात आल्यामुळे जोडधंदा म्हणूनही शेतकरी त्याला पसंती देत आहेत. मुंबईतील नोकरी सोडून येथे परतून शेळीपालन करण्यास तरुण तयार झाले आहेत. हे लक्षात घेऊन बॅंक ऑफ इंडियाने त्यांच्यासाठी प्रशिक्षण सुरू केले.

स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थान केंद्रातर्फे शेळीपालनाचे वर्ग झाले. प्रशिक्षक डॉ. आनंद लळित यांच्या अनुभवाचा फायदा झाला. पालन-पोषण व आजार यासंदर्भात त्यांनी आम्हाला अर्धा डॉक्‍टरच बनवले आहे, ही शेतकऱ्यांची प्रतिक्रिया बोलकी आहे. शेळीच्या उस्मानाबादी, सानेन, शिरोही, अजमेरी, बारबेरी आदी ४० जाती आहेत. पाच-सहा जातींच्या शेळ्या दूध, मांसासाठी रत्नागिरीत पाळल्या जातात. तीन वर्षांपासून उत्तर प्रदेशमध्ये द गोट ट्रस्ट संस्थेतर्फे शेळीपालनाचे प्रशिक्षण, उपचार, सल्ला असे काम डॉक्‍टर करतात.
सिव्हिल ड्राफ्टसमन राहुल लाखण यांनी मुंबईतील नोकरी सोडून या प्रशिक्षणात धडे गिरवले. या व्यवसायात फारशी स्पर्धा नाही व मागणी जास्त असल्याने तो लगेच व्यवसाय सुरू करणार आहे. 

निवेंडीतील लहू फेफडे म्हणाले की, मी तीन वर्षे शेळीपालन करतोय. मला येथे परिपूर्ण माहिती मिळाली. रोग, शेळी अडली तर काय करावे यासह अनक अडचणींवर मार्गदर्शन मिळाले. देवरूखच्या उमेद बचत गटाच्या संपदा जोशी म्हणाल्या की, मी शेळीपालनाचा जोडधंदा करणार. निवृत्त एसटी कर्मचारी दिनेश गांधी, सागर कळंबटे, अभिनव महाडिक यांनीही प्रशिक्षणाबाबत समाधान व्यक्त केले.

विविध उपचारांविषयी मार्गदर्शन...
डॉ. लळित यांनी शेळ्यांचा ताप घेणे, खच्चीकरण करणे, ॲपरन बांधणे, गोठ्याचे व्यवस्थापन, आयुर्वेदिक औषधांची माहिती दिली. गोचिडीवर तंबाखूचे उकळवलेले पाणी लावणे, खूर कापणे, रुई, कडूनिंब, तुळशीचा पाला उकळवून तो अर्क गुळातून पाजल्यास जंतांवर प्रभावी ठरतात, असे सांगितले. बोकडाचे वीर्य घेऊन द्रावण बनवून एकाच बोकडापासून अनेक शेळ्यांना गाभ घालवणे, एकाच वेळा औषध देऊन शेळ्यांना वाफेस आणणे याची माहिती दिली.

बकऱ्यांची सोनोग्राफी करून ती गाभण आहे का हे पाहणे, योग्य वेळी वाफेस आलेल्या बकरीला बोकड देणे याची माहिती दिली. गाय, म्हैस, शेळीसाठी कृत्रिम रेतनात लायकास्कोपचा वापर केल्यास त्या नक्की गाभण राहतात.
- डॉ. आनंद लळित, प्रशिक्षक
 

Web Title: ratnagiri news Konkani Farmers move to Goat farming