गुहागरचे ‘कामगार कल्याण’ महाडला?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 जून 2018

गुहागर - आमदार भास्कर जाधव यांनी कामगारमंत्री असताना गुहागरमध्ये सुरू केलेले कामगार कल्याण केंद्र बंद होण्याच्या मार्गावर आहे. या केंद्राचे देऊळकर यांची बदलीची मागणी आहे. तसेच हे कार्यालय महाडला हलविण्याच्या हालचाली सुरू आहेत. 

गुहागर - आमदार भास्कर जाधव यांनी कामगारमंत्री असताना गुहागरमध्ये सुरू केलेले कामगार कल्याण केंद्र बंद होण्याच्या मार्गावर आहे. या केंद्राचे देऊळकर यांची बदलीची मागणी आहे. तसेच हे कार्यालय महाडला हलविण्याच्या हालचाली सुरू आहेत. 

गुहागर तालुक्‍यातील १०१७ घरेलू कामगारांना प्रत्येकी १० हजारांप्रमाणे १ कोटी १ लाख ७० हजार रुपये लाभ जाधव यांनी कामगार मंत्री असताना मिळवून दिला होता. येथील कामकाज सुरळीत व्हावे म्हणून गुहागर शहरात त्यांनीच कामगार कल्याण केंद्र सुरू केले. १५ ऑगस्ट २०१४ ला या केंद्राचे उद्‌घाटन झाले. या केंद्रामध्ये सविता देऊळकर या एकमेव कर्मचारी कार्यरत आहेत.

गेले तीन वर्षे देऊळकर स्वत: लाभार्थी शोधण्याचे, कामगारांमध्ये योजनांची माहिती देण्याचे काम करीत होत्या. त्यांना साह्य करण्यासाठी गेल्या चार वर्षांत एकही कर्मचारी राज्य सरकारने उपलब्ध करून दिला नाही. देऊळकर यांनीही तीन वर्षे झाल्याने बदलीची मागणी केली आहे. तसेच कामगार मंत्रालयाकडून या कार्यालयातील कागदपत्रे महाडला नेण्याच्या हालचाली सुरू आहेत. 

कामगार कल्याण केंद्र बंद करण्यासंदर्भात कोणताही आदेश, सूचना मला मिळालेल्या नाहीत. कार्यालय दुरुस्तीचे काम सुरू आहे. पर्यायी जागा उपलब्ध नसल्याने केंद्राचे कामकाज बंद आहे. येथील कागदपत्रे महाडला नेण्याविषयी वरिष्ठांनी मला तोंडी सांगितले. 
- सविता देऊळकर,
केंद्रप्रमुख, कामगार कल्याण केंद्र

Web Title: Ratnagiri News labor welfare shifting from Guhagar to Mahad