लांजा तालुक्यात माय लेकींनी पकडली बिबट्याची मादी

रवींद्र साळवी
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

लांजा - घराच्या मागे असलेल्या खुराड्यामध्ये कोंबड्या का आवाज करतात, हे पाहण्यासाठी गेलेल्या माय-लेकींना खुराड्यात चक्क बिबट्या दिसला. त्याला पाहताच माय-लेकींची बोबडीच वळली. तरी त्यांनी धीर करुन खुराड्याचा दरवाज्या बंद करुन बिबट्याला कैद केले. ​

लांजा - घराच्या मागे असलेल्या खुराड्यामध्ये कोंबड्या का आवाज करतात, हे पाहण्यासाठी गेलेल्या माय-लेकींना खुराड्यात चक्क बिबट्या दिसला. त्याला पाहताच माय-लेकींची बोबडीच वळली. तरी त्यांनी धीर करुन खुराड्याचा दरवाज्या बंद करुन बिबट्याला कैद केले.

आजु- बाजुच्या लोकांना जमवुन वनविभागच्या कर्मचाऱ्यांना पाचारण केले. ही बिबट्याची मादी असुन सुमारे चार वर्षांची आहे.  ही मादी पकडुन नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आल्याची माहीती वनविभाागाचे वनपाल विलास गुरवळ यांनी दिली.

पकडलेल्या मादी बिबट्याचा व्हिडिआे पाहण्यासाठी क्लिक करा 

याबाबतची माहिती अशी की, सुषमा सोमा शिवगण व त्यांची मुलगी स्वाती या दोघी मायलेकी लांजा तालुक्यातील पुर्व भागातील भांबेड- दैत्यवाडी येथे राहतात. रविवारी रात्री साडे अकराच्या सुमारास या माय-लेकींना जेवणानंतर झोपण्याच्या तयारीत असतानाच घराच्या मागच्या भागातील पडवीतून  कोंबड्यांचा मोठ्याने आवाज एेकू आला. एवढ्या रात्री कोंबड्या का ओरडतात म्हणुन त्या दोघी पाहण्यासाठी गेल्या असता खुराड्यात त्यांना बिबट्या दिसला. बिबट्याला पाहुन त्या दोघींची बोबडीच वळली. तरी धीर करुन त्यांनी खुराड्याचा दरवाजा बंद करुन घेतला. त्यामुळे हा बिबट्या त्या खुराड्यात कैद झाला. त्यानंतर त्यांनी आरडाओरडा करुन आजु-बाजुच्या लोकांना जमविले. या पकडलेल्या बिबट्याची माहिती भांबेडचे वनरक्षक विक्रांत कुंभार व वनपाल विलास गुरवळ यांना दिली. ताबडतोब वनक्षेत्रपाल बी.आर.पाटील, वनपाल विलास गुरवळ यांनी पाहणी करुन सकाळी सहा वाजता तेथे पिंजरा लावला. पिंजऱ्याच्या माध्यमातून सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास बिबट्याला पकडण्यात आले.    

पकडण्यात आलेला बिबट्या हा मादी आहे. अंदाजे या मादीचे वय किमान ४ वर्षे आहे. लांबी 175 से. मी. तर उंची 65 से. मी आहे. कोंबड्यांना खाण्यासाठी ही मादी खुराड्यात शिरली. मात्र खुराड्याचा दरवाज्या बंद केला गेल्याने ही मादी या खुराड्यात कैद झाली होती. रात्रभर खुराड्यात ही मादी अडकुन पडल्याने तील पकडणे शक्य झाले.

- विलास गुरवळ, वनपाल

मादी बिबट्याला पकडण्यासाठी, वनक्षेत्रपाल बी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल विलास गुरवळ ,भांबेड वनरक्षक विक्रांत कुंभार, पाली वनपाल लक्ष्मण गुरव, राजापुर वनपाल राजश्री कीर, वनरक्षक एन. एस. गावडे, एस. वी. गोसावी, दिलिप आरेकर, अरविंद मांडवकर, डी. आर. कोल्हेकर, प्राणी मित्र सागर वायंगणकर यानी सहभाग घेतला होता.

 

 

Web Title: Ratnagiri News Leopard found Lanja Taluka

टॅग्स