विहिरीत पडलेल्या बिबट्याला वायंगणे-नवेलेवाडीत जीवदान

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 मार्च 2018

साडवली - देवरूखजवळील वायंगणे-नवेलेवाडी येथील विठ्ठल बाबू नवेले यांच्या घराजवळील विहिरीत भक्ष्याचा पाठलाग करताना गुरुवारी मध्यरात्री बिबट्या विहिरीत कोसळला. वनविभाग अधिकारी, वनरक्षक व ग्रामस्थांच्या मदतीने या बिबट्याला शुक्रवारी सकाळी विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले. ती अडीच वर्षाची मादी होती. 

वायंगणे-नवेलेवाडीतील विठ्ठल नवेले यांच्या घराजवळील विहिरीत बिबट्या पडला असल्याची माहिती सरपंचांनी दूरध्वनीवरून वनविभागाला दिली. यावर अधिकारी, वनरक्षक यांनी पिंजर्‍यासह नवेलेवाडीत दाखल झाले. त्यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने या मादीला सुखरूप बाहेर काढले.

परिक्षेत्र वन अधिकारी श्री. निलख, विभागीय वन अधिकारी जगताप, देवरूख परिक्षेत्राचे गुरव, वनरक्षक सागर गोसावी, लहू कोळेकर, दिलीप आरेकर, विक्रम कुंभार, राहुल गुंटे, गावडे यांनी ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याला बाहेर काढले. 

वनविभागाला सरपंच सुरेश घडशी, ग्रामस्थ संतोष कदम, दिलीप गुरव, रवी गोपाळ यांनी मदत केली. अडीच वर्षाची बिबट्या मादीस पिंजर्‍यासह आधी देवरूख येथे आणण्यात आले व नंतर सुरक्षित अधिवासात सोडण्यात आले.

Web Title: Ratnagiri News leopard found in Sangameshwar taluka