वन कर्मचाऱ्यांच्या आडवा आला बिबट्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 ऑक्टोबर 2017

देवरुख - डुकरासाठी लावलेल्या फासकीत अडकलेला बिबट्या कोसूंबमधून पळून गेला. त्या बिबट्याला पकडण्यासाठी आलेल्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना बिबट्याने भररस्त्यात दर्शन दिले. साखरपा येथे पिंजरा बसवून ते देवरुखात परतत होते. हा प्रकार शुक्रवारी (ता. ६) सायंकाळी घडला. त्यामुळे साखरपा परिसरातील बिबट्याचे वास्तव्य अधोरेखित झाले आहे. 

सीमेच्या वाडीतील एका शेतात डुकरासाठी लावलेल्या फासकीत बिबट्या अडकला होता. त्याला पकडण्यासाठी वनपाल व्ही. आर. मुळ्ये, वनरक्षक दिलीप आरेकर, सागर गोसावी, बी. आर. कोळेकर आदी कर्मचारी सकाळी ७ वाजता साखरपा गुरववाडी येथील पिंजरा घेऊन कोसुंब येथे पोचले; पण त्याआधी हा बिबट्या निसटला. बिबट्याचा मागमूस नसल्याने कर्मचाऱ्यांनी तो पिंजरा पुन्हा साखरपा गुरववाडीत लावण्याचा निर्णय घेतला. साखरपा-गुरववाडीत गेल्याच महिन्यात एका घरात घुसून बिबट्याने तिघाना गंभीर जखमी केले होते. त्याला पकडण्यासाठी कर्मचारी संध्याकाळी गुरववाडीत गेले. तेथे पिंजरा लावल्यावर सर्व कर्मचारी एका गाडीने देवरूखकडे परतत असताना रात्री ८ च्या दरम्यान साखरप्यापासून मोर्डे खिंडीच्या अलीकडे बिबट्याच कर्मचाऱ्यांच्या गाडीसमोर अवतरला. बिबट्या गाडीसमोरून दरीकडे गेला. 

Web Title: ratnagiri news leopard seen in Sakharapa region

टॅग्स