सोमेश्वर येथे बिबट्या पकडण्यात यश

मकरंद पटवर्धन
रविवार, 24 जून 2018

रत्नागिरी  - शहरालगत असणाऱ्या सोमेश्वर या गावामध्ये आज पहाटेच्यावेळी बिबट्याल जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले.

सोमेश्वर येथे पवार यांच्या भातशेतीसाठी लावलेल्या तारेच्या कुंपणात बिबट्या अडकला. कालपासून लोकांना बिबट्याचा आवाज येत होता, परन्तु दिसला नव्हता. आज पहाटे साडेपाचच्या सुमारास ग्रामस्थांना बिबट्या दिसला. त्यानंतर त्यांनी लगेच वन विभागाशी संपर्क साधला.

तालुका वन अधिकारी श्रीमती प्रियांका लगट, श्रीमती किर तसेच वन विभागातील कर्मचारी अधिकारी पिंजरा घेऊन आले. एकातासाच्या परिश्रमानंतर बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात यश आले. हा बिबट्या 3 वर्षांचा असून त्याच्या अंगावर कोठेही जखमा झालेल्या नाहीत. बिबट्या पकडल्याची बातमी कळताच ग्रामस्थांनी गर्दी केली.

Web Title: Ratnagiri News Leopard seen in Someshwar