सासऱ्याच्या खून प्रकरणी जावयाला जन्मठेप

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जानेवारी 2018

खेड - सासरा आपला मानपान ठेवत नाही, आपल्याला किंमत देत नाही, पत्नी वारंवार माहेरी जाते, याचा राग धरून जावयाने सासऱ्याला गणपती विसर्जन तलावात बुडवून खून केल्याप्रकरणी जावयाला खेडच्या जिल्हा न्यायालयाने जन्मठेप ठोठावली. 

खेड - सासरा आपला मानपान ठेवत नाही, आपल्याला किंमत देत नाही, पत्नी वारंवार माहेरी जाते, याचा राग धरून जावयाने सासऱ्याला गणपती विसर्जन तलावात बुडवून खून केल्याप्रकरणी जावयाला खेडच्या जिल्हा न्यायालयाने जन्मठेप ठोठावली. 

अनंत रामचंद्र कदम (वय ३३, रा. गणेशनगर, आवाशी, खेड) असे त्या आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने जन्मठेपेसह त्याला ५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास १ महिना सश्रम कारावास भोगावा लागणार आहे. सरकार पक्षातर्फे ॲड. मेघना सुहास नलावडे यांनी बाजू मांडली. 

अनंत कदम याची पत्नी मुंबईहून आवाशीला सासरी आली होती. तिला सोडायला वडील दत्तात्रय काशिराम निकम (वय ८०) आले होते. त्यांना परत मुंबई गाडीत बसवायला जातो, असे सांगून जावई बस स्थानकाकडे निघाले. वाटेत दोघांत शाब्दिक वाद झाले. त्यातून जावयाने सासऱ्याला मारहाणही केली. राग अनावर झाल्याने जावयाने जवळच असणाऱ्या तलावात 
बुडवून त्यांना ठार मारले. सासऱ्यांना वाचवायला आलेल्या कृष्णाजी आंब्रे व अन्य प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांना आरोपीने धक्काबुकी केली. ही घटना ८ नोव्हेंबर २०११ ला सकाळी साडेसहा वाजता घडली. तपासिक अंमलदार म्हणून खेडचे तत्कालीन पोलिस निरीक्षक संजीव घाडगे यांनी तपास करून दोषारोपत्र ठेवले. ॲड. मेघना नलावडे यांनी १३ साक्षीदार तपासले. त्यानंतर जिल्हा न्यायाधीश जे. पी. झपाटे यांनी आरोपींना जन्मठेप ठोठावली.

Web Title: Ratnagiri News life imprisonment In the case of father in laws murder