बारा वर्षांनंतर बागकर यांचे घर प्रकाशमान 

मयुरेश पाटणकर
शुक्रवार, 27 जुलै 2018

गुहागर - सत्तार इब्राहिम बागकर यांच्या घरी वीज आली आहे. 2004 पासून दोन वर्षांचा अपवाद वगळता 12 वर्ष बागकर कुटुंब अंधारात राहत होते. भाजपचे गटप्रमुख उमेश भोसले आणि नगरसेवक समीर घाणेकर यांच्या प्रयत्नांना यश आले.  

गुहागर - सत्तार इब्राहिम बागकर यांच्या घरी वीज आली आहे. 2004 पासून दोन वर्षांचा अपवाद वगळता 12 वर्ष बागकर कुटुंब अंधारात राहत होते. भाजपचे गटप्रमुख उमेश भोसले आणि नगरसेवक समीर घाणेकर यांच्या प्रयत्नांना यश आले.  

शहरातील आरे पुलाजवळ शिवाजीनगरात 2004 मध्ये बागकर यांनी घर बांधले. 2004 ते 2014 पर्यंत त्यांच्या घरात वीज नव्हती. सत्तारनी वीज मिळवण्यासाठी महावितरणचे उंबरठे अनेक वेळा झिजवले. त्यानंतर वीज मीटर मंजूर झाला. घरात वीज आली. परंतु खांब उभा केलेल्या जागामालकाने हरकत घेतली. खांब काढून टाकण्याचा दबाव आणला. त्यामुळे 2014 ते 2016 या दोन वर्षात घरात आलेली वीज पुन्हा बंद झाली होती. 

मे 2018 मध्ये ही गोष्ट भाजपचे गटनेते उमेश भोसले व नगरसेवक समीर घाणेकर यांना समजली. या दोघांनी महावितरणच्या अधिकार्‍यांना परिसरात नेले. पाहणी केली त्यावेळी एक खांब टाकला तर वीज मिळू शकते ही बाब समोर आली. सौभाग्य योजनेतून दारिद्य्ररेषेखालील कुटुंबांना महावितरणकडून एक विजेचा खांब मोफत मिळतो हे समजल्यावर बागकर यांचा प्रस्ताव तयार केला. त्याला मंजुरी मिळाल्यावर भर पावसात खांब उभा करण्यात आला. 25 जुलैला महावितरणने वीजमीटरही बसवून घर प्रकाशमान झाले.

Web Title: Ratnagiri News Light reach after 12 years in Sattar Bagkar house