टिळक जन्मस्थळाची दुरवस्था पडली नजरेस

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

रत्नागिरी - लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीलाच शहरातील टिळक जन्मभूमीच्या दुरवस्थेवर प्रकाश पडला. यानिमित्ताने अनेकजण टिळक जन्मस्थानी गेले असता त्यांना हे चित्र पाहायला मिळाले. तेथील खापरी (गावठी) कौले विस्कटली आहेत. हॉलपासून पाठीमागील भाग अस्वच्छ आहे, अतिथीगृह म्हणून वापरात असलेला भाग तर बंदच ठेवला आहे, ही दुर्दैवी अवस्था बघून अनेकांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. 

जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास पत्रकारांनी दुरवस्था आणून दिली. त्याबरोबर जिल्हाधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घातले. त्यामुळे जन्मस्थानाची दुरुस्ती होणार आहे. हॉलमध्ये टिळकांबाबत डाक्‍युमेंटरी पाहायला मिळणार आहे. त्यांच्या वस्तू, पुस्तके आदींचा संग्रह केला जाणार आहे. तशा सूचना पुरातत्त्व विभागाला दिल्याचे जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी सांगितले. 

जन्मस्थळ पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात असल्याने दरवर्षी त्याची डागडुजी या विभागाकडून केली जाते. त्यासाठी एका व्यक्तीची नियुक्तीही केल्याचे सांगण्यात येते; परंतु प्रत्यक्ष वस्तुस्थिती वेगळीच आहे. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच’, असे इंग्रजांना निधड्या छातीने ठणकावणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या जन्मभूमीची अवस्था मात्र उपेक्षित असल्याप्रमाणे आहे. जन्मस्थळाला भेट देण्यासाठी देश-विदेशातून अनेक पर्यटक येतात. स्थानिक नागरिकांसह जिल्हा आणि राज्यातील पर्यटकांची ये-जा सुरू असते. 

जन्मस्थळ मूळ स्वरूपात जतन करण्यात आले असले, तरी एक पुरातन वास्तू म्हणून त्यामध्ये चैतन्य आणण्यात पुरातत्त्व विभागाला अपयश आले आहे. टिळकांना मानवंदना देण्यासाठी अनेक नागरिक, पत्रकारांनी जन्मभूमीला भेट दिली. तेव्हा जन्मस्थानाची अवस्था फारच वाईट दिसली. त्यामुळे झालेल्या वेदना त्वरित जिल्हाधिकाऱ्यांकडे पोचविण्यात आल्या. तेव्हा ते म्हणाले, ‘‘मी टिळक जन्मस्थानाला भेट दिली. परिस्थिती खरोखरच वाईट आहे. त्यामुळे पुरातत्त्व विभागाला याबाबत सूचना केल्या आहेत. त्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. येथे जो मोठा हॉल आहे, या हॉलमध्ये टीव्ही व आवश्‍यक सुविधा उपलब्ध करून देऊन टिळकांची डाक्‍युमेंटरी दाखविण्यात येईल. त्यांची भाषणे, ज्या शाळा क्र. २ मध्ये काही महिने त्यांनी शिक्षण घेतले, त्याचे पुरावे, त्यांची पुस्तके आदी ठेवण्यात येणार आहे.’’

Web Title: ratnagiri news Lokmanya Tilak

टॅग्स