संगमेश्वर तालुक्यात सहा गावांचा एकच माघी गणेशोत्सव

प्रमोद हर्डीकर
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

साडवली - एक गाव एक गणपती ही प्रथा रुढ होत असतानाच गेली चार वर्ष संगमेश्वर तालुक्यातील काटवली, सायले, सोनवडे, बोरसुत, विघ्रवली, कोंडओझरे या सहा गावातील ग्रामस्थ एकत्र येवून माघी गणेशोत्सव साजरा करत आहेत.

साडवली - एक गाव एक गणपती ही प्रथा रुढ होत असतानाच गेली चार वर्ष संगमेश्वर तालुक्यातील काटवली, सायले, सोनवडे, बोरसुत, विघ्रवली, कोंडओझरे या सहा गावातील ग्रामस्थ एकत्र येवून माघी गणेशोत्सव साजरा करत आहेत. यंदाचे हे पाचवे वर्ष आहे. २१ जानेवारी ते २५ जानेवारी असा हा उत्सव दिमाखात साजरा होणार आहे.

यंदा काटवली ढोसलवाडी येथे हा पंचक्रोशीचा राजा विराजमान होणार आहे. यंदाची गणेशमूर्ती देवरुखचे सुरेश मेस्ञी यांनी तयार केली आहे.

गावात एकी नांदावी, गावागावात शांतता नांदावी, आपुलकी वाढावी या हेतुने सायले गावात संत गाडगेमहाराज चौकात या एकत्रीत उत्सवाची सुरुवात झाली. यंदाच्या या माघी गणेशोत्सवाची खास बाब म्हणजे यंदा या गावातून कोणतीही वेगळी वर्गणी गोळा केली जाणार नाही. या गावातील प्रत्येक नागरीक एकएक जबाबदारी स्वतःहून पार पाडत असतो. या उत्सवातील मंडप बाळकृष्ण उबारे, सुर्यकांत पेंढारी हे उभारतात, गणेशमूर्तीची जबाबदारी यापूर्वी शेखर पांचाळ, अमित मेस्त्री, सुधाकर मेस्त्री, संजय कोळंबेकर व सुरेश मेस्त्री यांनी पार पाडली.

संपूर्ण पंचक्रोशी एकत्र येवून पूजा आरती, धार्मिक विधी एकत्रीत साजरे करतात हेच या गणेशोत्सवाचे वेगळेपण ठरत आहे. यंदाच्या उत्सवात २१ रोजी सकाळी देवरुख कांजिवरा ते काटवली अशी श्रींची मिरवणूक निघणार आहे. 

Web Title: Ratnagiri News Maghi Ganesh Festival in Sangmeshwar taluka