आदर्श शाळा घडवणारी शिक्षिका..मानसी गवंडे

आदर्श शाळा घडवणारी शिक्षिका..मानसी गवंडे

रत्नागिरी - शिक्षण म्हणून काम करत असताना केवळ पुस्तकी ज्ञान मुलांना देणे एवढेच शिक्षकाचे काम नसुन त्या पलिकडे देखील मुलांचा विकास करता येतो..मुलांना स्मार्ट करण्यासाठी त्यांची शाळा प्रथम सुसज्ज करावी लागते. शाळा हेच विद्येचे माहेरघर म्हटले जाते मात्र निर्जीव शाळेच्या भिंती बोलक्या करुन मुलांचा सर्वांगिण विकास साधण्याचा प्रयत्न एका महीला शिक्षिकेने केलाय. मानसी अविनाश गवंडे असे या महीलेचे नाव आहे.

त्यांनी आपल्या शैक्षणिक कारकिर्दीत रत्नागिरी तालुक्यातील दोन शाळा आदर्श शाळा घडवल्या आहेत. तसेच तालुक्यातील पहीली आयएसओ शाळा करण्याचा बहूमान देखील त्यांनी मिळवला आहे. त्यांनी लोकसहभागातून  हे कार्य केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत राज्य शासनाने त्यांना आदर्श शिक्षक म्हणून देखील गौरविल आहे.

केवळ पुस्तकात छापलेले तेवढेच विद्यार्थ्यांना शिकवणे हे शिक्षकाचे तेवढेच काम नव्हे... सुजाण नागरिक बनवणे, जीवनामध्ये यशस्वी होता येईल या साऱ्या गुणांचा विकास विद्यार्थ्यांमध्ये व्हावा. या प्रेरणेने मानसी गवंडे यांनी प्रयत्न केले आणि त्यात त्यांना यशही आले.. 

रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषदेची भोके-मठवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत ग्रामीण विकासाचा पाया हा शिक्षणातच असतो. शाळा बोलक्या तसेच आदर्श होऊ शकतात याचा वस्तुपाठच मानसी यांनी समाजापुढे ठेवला आहे. इथल्या भिंती तुमच्याशी बोलतात..शाळेची कोपरान कोपरा तुम्हाला काही ना काही देऊन जातो.. सध्या जिल्हा परिषदेच्या आदर्श शाळा भोके मठवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणून त्या कार्यरत आहेत..स्वत:पासून समाजकार्याला सुरवात करून शाळा हेच माहेर आणि विद्यार्थी हेच सर्वस्व मानून त्यांनी वाटचाल सुरू ठेवली. दुर्लक्षित आणि दुर्गम भागात शिक्षण रूजवण्यातच धन्यता मानली. शैक्षणिकदृष्ट्या पालकांमध्ये जागृती करून मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यात यश मिळवताना त्यांना प्रचंड मेहनत घ्यावी लागली. 

पोमेंडी खुर्द आणि भोके मठवाडी या दोन शाळा त्यांच्या मुख्याध्यापिका कारकिर्दीत आदर्श शाळा झाल्या. शहरी भागातील मुलांप्रमाणेच ग्रामीण भागातील मुलांना शिक्षण मिळू शकते हेच मानसी यांनी दाखवून दिले. वेळेस पदरचे पैसे देखील त्यांनी विद्यार्थ्यांसाठी आणि शाळेच्या विकासासाठी खर्च केले. जिल्हा परिषदेच्या अनेक दुर्लक्षित, मोडकळीस आलेल्या शाळांना त्यांनी आदर्श शाळाचा नावलौकिक मिळवू दिला आहे. मग तो शाळेची पटसंख्या वाढवणे असो किंवा शिक्षण आणि शाळेसाठीची तळमळ असो. त्यांच्या याच कामाची दखल प्रथम जिल्हा परिषदेने घेतली आणि मग राज्य सरकारने घेत त्यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार दिला. या पुरस्काराची मिळालेली रक्कम त्यांनी ज्या शाळेत नोकरी केली त्या शाळेमध्ये विभागून दिली..

मिळालेले पुरस्कार...

उत्कृष्ठ पटनोंदणी पुरस्कार, सानेगुरूजी आदर्श शिक्षक पुरस्कार, जिल्हा परिषद आदर्श शाळा पुरस्कार पोमेंडी खुर्द, आनंदायी शाळा पुरस्कार, जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार, जिल्हा परिषद आदर्श शाळा पुरस्कार भोके मठवाडी, वुमन आयकाँन पुरस्कार (रत्नागिरी - सिंधूदुर्ग), आयएसओ मानांकन शाळा भोके मठवाडी,

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com