मंडणगडमध्ये वादळी पावसाने झाडे उन्मळल्याने वाहतुकीत अडथळे

सचिन माळी
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

वाहन चालकांनी गाड्या सावकाश चालवाव्यात. प्रत्येकाने आपली स्वतःची काळजी घ्यावी. सुरक्षित ठिकाणी राहावे.

मंडणगड : रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात सकाळी साडेनऊ वाजता वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली असून, अनेक मार्गावर झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला.

दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरु असून यामुळे भात पिकांना धोका निर्माण झाला आहे. शेतकरी राजा चिंतेत. दिवसभरात १३८ मिमी पावसाची नोंद झाली असून तालुक्यात एकूण ३४६१ मिमी पाऊस झाला आहे. आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

वाहन चालकांनी गाड्या सावकाश चालवाव्यात. प्रत्येकाने आपली स्वतःची काळजी घ्यावी. सुरक्षित ठिकाणी राहावे. आपत्कालीन परिस्थिती आढळून आल्यास त्वरित प्रशासनाला कळवावे असे आवाहन तहसीलदार प्रशांत पानवेकर यांनी केले आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: ratnagiri news mandangad heavy rain winds