जोग नदीपात्रातील कचर्‍याची तातडीने विल्हेवाट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 मे 2018

दापोली - जोग नदीच्या काठावर आणि पात्रात उघड्यावर धोकादायक मेडिकल वेस्ट टाकल्याचे वृत्त गुरुवारी (ता. 17) ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध होताच नगरपंचायत प्रशासनाने संबंधित ठिकाणी भेट देऊन टाकलेल्या कचर्‍याची तातडीने विल्हेवाट लावली. 

दापोली शहरात बँक ऑफ इंडियाच्या मागील बाजूस असलेल्या जोग नदीच्या काठावर आणि पात्रात रिकाम्या सलाईनच्या बाटल्या, हँड ग्लोव्हज, वापरलेला कापूस आदी जैव वैद्यकीय कचरा टाकण्यात आला होता. याबाबतचे वृत्त सकाळमध्ये प्रसिद्ध होताच कचरा टाकण्याची शक्यता असलेल्या एका खासगी रुग्णालयाच्या प्रशासनाला नगरपंचायतीने कायदेशीर कारवाई करण्याची तंबी दिली.

दापोली शहरात लोटे येथून महाराष्ट्र बायो हायजेनिक मॅनेजमेंट प्रा.लि. या कंपनीतर्फे जैव वैद्यकीय कचरा उचलण्यात येतो. या कंपनीची गाडी आठवड्यातून तीन ते चार वेळा दापोलीत येऊन हॉस्पिटल्स, दवाखाने आणि  क्लीनिकल  लॅब मधून मेडिकल वेस्ट गोळा करून घेऊन जाते. या कंपनीची गाडी घरपोच सेवा वैद्यकीय व्यावसायिकांना देत असूनही काही व्यावसायिक मेडिकल वेस्टविषयी बेफिकिरी दाखवत हा कचरा उघड्यावर नदीत टाकत असल्याने दापोली शहरातील सर्वसामान्यानी नाराजी व्यक्त केली. 

Web Title: Ratnagiri News Medical waste removed from Jog river